Last Updated:
Shocking Incident : भिवंडी शहरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथं कामावरुन काढल्याच्या रागातून एका तरुणाने अत्यंत धक्कादायक प्रकार केलेला आहे. नक्की काय घडलं आहे आणि कोणासोबत घडलं आहे, याबाबत सविस्तर जाणून घ्या.
ठाणे : दुपारची शांत वेळ आणि अचानकपण घरात शिरलेला एक नराधम. फक्त कामावरुन काढल्याचा रागातून एका निष्पाप चिमुरडीसह कुटुंबासोबत जे केलं अत्यंत थरकापजनक आहे. भिवंडीमध्ये घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली असून नक्की काय झाले ते घरात पाहुयात.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीमध्ये विनोद अग्रवाल यांचा एक धागा निर्मिताचा कारखाना आहे. याच कारखान्यात आरोपी जितेंद्रकुमार गौतम हा कामाला होता. पण चार ते पाच दिवसांपूर्वी जितेंद्रकुमारला कामावरुन काढले होते. आपल्याला कामावरुन काढल्याचा राग त्याच्या मनात प्रचंड बसला होता. याच रागातून जितेंद्रकुमार रविवारी साधारण दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान थेट विनोद अग्रवाल यांच्या मानसरोवर येथील घरी पोहोचला.
दु्र्दैवाने रविवारी दुपारी विनोद अग्रवाल हे त्यांच्या घरी नव्हते. पण घरात त्यांची पत्नी, आई आणि अवघ्या अडीच वर्षांची मुलगी होती. जितेंद्रकुमारने घरी शिरताच विनोद कुठे आहेत,असे विचारले. पत्नी ते घरी नसल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर जितेंद्रकुमारने आपला रागाचा संयम गमावला. धक्कादायक म्हणजे त्याने अचानक खिशातून चाकू काढला आणि विनोद यांच्या पत्नीवर वार केला आणि त्याने त्यांना जोरात ढकलून दिले, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. एवढेच नाही तर त्याने चाकूने पत्नीच्या बोटावर, कोपरावर आणि कानाजवळ गंभीर वार केले.
आरोपी यावरच थांबला नाही तर त्याने मदतीसाठी आलेल्या विनोद यांच्या आईलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. क्रुरतेची गोष्ट म्हणजे घरात असलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीला ही त्याने मारुन ढकलून दिले. घरातील आरडाओरडीमुळे परिसरातील नागरिक तातडीने मदतीसाठी घरी धावून गेले आणि नागरिकांनी जितेंद्रकुमारला पकडून ठेवले. पोलिसांना या घटनेची माहित देत त्याला त्यांच्या ताब्यात दिले.
सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात जितेंद्रकुमारवर गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Mumbai,Maharashtra
मालकाच्या ‘त्या’ कृत्याचा घेतला भयंकर बदला! पत्नीला दिली आक्रीत शिक्षा, दीड वर्षाच्या मुलीलाही सोडलं नाही
