Kavya Maran Wedding: हैदराबाद सनरायझर्सची मालकीण काव्या मारनचं लग्न ठरलं; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकासोबत बांधणार साताजन्माची गाठ


Kavya Maran Wedding: आयपीएल (IPL 2026) फ्रँचायझी ‘सनरायझर्स हैदराबाद’ (SRH)ची सीईओ काव्या मारन हिची लगीनघाई सुरू झालीय. लाखो दिलाची धडकन असलेली 18000 कोटींच्या सनरायझर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) मालकीण काव्या मारन (Kavya Maran) हिचं लग्न ठरल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांचा हार्ट ब्रेक झालाय. तर काव्या मारन नेमकं कुणाच्या नावाचं डोरलं गळ्यात बांधणार? याची उत्सुकता ताणली गेलीय. काव्या मारन प्रसिद्ध म्युझिक कंपोझर (Music Composer), गायक अनिरुद्ध रविचंदर (Singer Anirudh Ravichander) यांच्याशी लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. यापूर्वीही दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलेलं, पण त्यावेळी गायकाच्या टीमनं या चर्चा फेटाळून लावलेल्या. पण, आता कुटुंबातील व्यक्तीनंच सांगितल्यामुळे दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातंय. 

म्युझिक कंपोझर-गायक अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन यांच्या लग्नाबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती आणि आता अशी माहिती समोर आली आहे. की, हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. अनिरुद्धचे मामा आणि अभिनेते वाय. जी. महेंद्रन यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. तसेच, काव्या आणि अनिरुद्धचं अभिनंदन केलंय. गेल्या एक-दोन वर्षांपासून, आयपीएल संघ ‘सनरायझर्स हैदराबाद’ची मालक असलेल्या काव्या मारन आणि अनिरुद्ध यांच्यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा रंगली होती.

अनिरुद्ध आणि काव्या मारन यांच्या लग्नाबाबत अनेक महिन्यांपासून तर्क-वितर्क लावले जात होते. आता अनिरुद्धचे मामा वाय. जी. महेंद्रन यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला असून, या दोघांच्या आगामी लग्नाचे संकेत दिलेत. 

अनिरुद्धचे मामा अभिनेते वाय. जी. महेंद्र नेमके काय म्हणाले? (Kavya Maran, Singer Anirudh Ravichander)

या सर्व चर्चांची सुरुवात अनिरुद्ध यांचे काका आणि अभिनेते वाय. जी. महेंद्र यांनी लग्नाबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे झालीय. ‘केपीटीव्ही’ला (KPTV) दिलेल्या एका मुलाखतीत, अनिरुद्धच्या लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “अनिरुद्ध हा अत्यंत समजूतदार मुलगा आहे. माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार, काव्या मारन यांच्याशी त्याचं लग्न जवळपास निश्चित झालंय. तो एका अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबाचा भाग होणार आहे. या निमित्तानं मी त्याचं अभिनंदन करू इच्छितो…”

काव्या मारनबाबत काय म्हणाले वाय. जी. महेंद्र? 

काव्या मारन यांच्याबद्दल बोलताना अभिनेते महेंद्र म्हणाले की, “काव्या काही सामान्य महिला नाही, तिच्याकडे आयपीएलमधील एका मोठ्या संघाचं व्यवस्थापन करण्याची क्षमता आहे. तिला तिच्या वडिलांकडून व्यवसायाची समज वारशानं मिळाली आहे. त्यांची जोडी उत्तम आहे आणि त्यांनी एकत्र येऊन संगीत व्यवसायातही नशीब आजमावून पाहायला हवं…”

लग्न कधी आणि कुठे होणार आहे?

काव्या आणि अनिरुद्ध यांचं लग्न कधी आणि कुठे होईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर याबद्दल सध्या कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. हे दोघे कधी विवाहबंधनात अडकणार? याचीही सर्वांना उत्सुकता लागली आहे. 

यापूर्वीही एकमेकांशी जोडली गेलेली नावं

काव्या आणि अनिरुद्ध एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या यापूर्वीही आलेल्या. पण, दोघांनीही त्यावर कोणतंही भाष्य केलं नव्हतं. लग्नाबाबतही दोघांकडून कोणतंही वक्तव्य करण्यात आलं नव्हतं. विशेष म्हणजे, 2025 मध्ये रेडिटवर (Reddit) व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, दोघे साधारण वर्षभरापासून एकमेकांना डेट करत होते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kangana Ranaut Bite Vir Das Lip While Kissing Scene: कंगना रनौतनं किसिंग सीनवेळी रक्त येईपर्यंत चावलेले ‘या’ अभिनेत्याचे ओठ? पत्रकाराच्या दाव्यानंतर खळबळ, आता म्हणतेय…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *