Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026: विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीचा (Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026) कार्यक्रम सभापती राम शिंदे यांनी काल (29 जून) सभागृहात जाहीर केला आहे. त्यानुसार, 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक होणार आहे. महायुतीत भाजपची विधान परिषदेत सदस्य संख्या सर्वाधिक असली तरी उपसभापती पद शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाणार आहे. सध्या शिवसेनेत उपसभापती पदावरून मोठी चुरस पाहायला मिळत आहे. (Vidhan Parishad Upsabhapati Election)
माजी उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) प्रबळ दावेदार पण यंदा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपसभापती पदाच्या निवडणुकीत मोठं सरप्राईज देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी उपसभापती पदाबाबत महत्वाचा निर्णय होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेत उपसभापती पदावरून दोन जणांमध्ये मोठी चुरस रंगल्याची सूत्रांची माहिती आहे.
चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने यांच्यात उपसभापती पदावरुन चढाओढ- (Chandrakant Raguvanshi And Krupal Tumane)
चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने यांच्यात उपसभापती पदावरुन चढाओढ पाहायला मिळत आहे. चंद्रकांत रघुवंशी हे उपसभापती व्हावेत यासाठी उत्तर महाराष्ट्रातील 9 आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिलं आहे. अमोल पाटील, गोकुळ गिते, सत्यजीत तांबे, आमशा पाडवी, किशोर पाटील, चंद्रकांत सोनावणे, चंद्रकांत पाटील , मंजूळा गावात, तुळशीराम गावीत यांनी चंद्रकांत रघुवंशी यांना उपसभापतीपद दिलं जावं, अशी मागणी केली आहे. परंतु या आधीचे अनुभव पाहता एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरून पुन्हा वेगळ्याच आमदाराला हे पद देखील देऊ शकतात, त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.
नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर उपसभापतीचं पद रिक्त- (Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026)
माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्या शिवसेना शिंदे गटाकडून बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्याच गळ्यात उपसभापतीपदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पक्षांतर्गत चर्चेत कृपाल तुमाने, चंद्रकांत रघुवंशी आणि मनीषा कायंदे यांचीही नावे पुढे आली आहेत. त्यामुळे अंतिम क्षणापर्यंत उत्सुकता कायम राहणार आहे.
निवडणुकीचा 1 जुलैला निकाल जाहीर होणार- (Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026)
विधान परिषदेत महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने ते उमेदवार देणार की निवडणूक बिनविरोध होणार, याकडेही लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज, छाननी, माघार आणि त्यानंतर मतदान अशी प्रक्रिया पूर्ण होणार असून, आवश्यक असल्यास 1 जुलैलाच निकाल जाहीर केला जाईल.
संबंधित बातमी:
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?