Uddhav Thackeray:शाह सेनेच्या गद्दाराला सुपारी दिलीय, फडणवीसांना इथं गुंतवून ठेवा; हा खाऊसाहेब वाकचौरे जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी, सापडला तर सोडू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल


Uddhav Thackeray: हा भाऊसाहेब नाही, खाऊसाहेब वाकचौरे आहे. जाऊ तिथं खाऊ, याच्या नसानसात गद्दारी असून सापडला तर सोडू नका, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. या गद्दाराला पहिल्यांदा आपण 2009 ला निवडून दिलं होतं आणि 2014 ला हा पळाला होता. हा पळाला आणि आपलं सरकार आलं. म्हटलं चांगलं आहे, असं असतं तर आधीच पळवलं असतं याला, पण हे जिथे जातात तिथे बट्ट्याबोळ होतो, काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसचं सरकार पडलं, असा टोला त्यांनी लगावला. ते म्हणाले की, आता शाह सेनेमध्ये गेलेत, त्यांचंही सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. कारण ही शिर्डी आहे, साईबाबांची शिर्डी आहे, पवित्र शिर्डी आहे. इकडे श्रद्धा आणि सबुरीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रद्धा असावी लागते, जशी आपली साईबाबांवर आहे, जशी आपली आपल्या कामावर आहे, जशी आपल्या भगव्यावर आहे. त्यांनी सांगितले की, यांची कोणावर श्रद्धा नाही. रोज नवीन बाप! सबुरीचा तर पत्ताच नाही. थांबला असता, तर आपलं केंद्रात सरकार आलं होतं.   

गद्दाराला सुपारी दिलीय 

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, त्या शाह सेनेच्या प्रमुखाला, गद्दाराला सुपारी दिली आहे. याला (देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून) गुंतवून ठेवा इथे. ते पुढे म्हणाले की, मी मंदिरात जाऊन आल्यानंतर “काय प्रार्थना केली? काय प्रार्थना केली?”  विचारत होते. मी म्हटलं, “मी प्रार्थना हीच केली की या देशावर आणि या राज्यावर जे संकट आलं आहे, हे संकट, हे अरिष्ट लवकर दूर कर. ही सगळी भ्रष्ट राजवट लवकरात लवकर गाडून टाक आणि पुन्हा एकदा माझ्या देशाला सुजलाम-सुफलाम आणि चांगले दिवस येवो, ही मी साई चरणी प्रार्थना केलेली आहे.” देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीचं रक्षण कर असही बोललो असल्याचे ते म्हणाले. 

उद्धव ठाकरे म्हणाले, 2029 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपमध्ये अंतर्गत चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ नयेत म्हणून त्यांना आत्ताच बदनाम करण्याचे आणि अडकवून ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. भाजपपेक्षा महाराष्ट्रात ‘शाह सेनेची’ताकद कशी वाढवली जात आहे, यावर त्यांनी भाष्य केले. निवडणुकांनंतर खासदार फोडून स्वतःच्या गटात सामील केल्याचा आरोप त्यांनी केला.

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *