Vidhan Parishad Deputy Chairman: उपसभापतीपदासाठी निवडणूक जाहीर, एकनाथ शिंदे पुन्हा मोठं सरप्राईज देण्याच्या तयारीत; नीलम गोऱ्हेंसह कुणाच्या नावाची चर्चा?


Vidhan Parishad Deputy Chairman Election: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती (Deputy Chairman) पदासाठी अखेर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विधान परिषदेचे सभापती (Chairman) राम शिंदे (Ram Shinde) यांनी निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं असून 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता उपसभापतीपदासाठी मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत माजी उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या सर्वात प्रबळ दावेदार मानल्या जात असल्या, तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत नवा चेहरा पुढे करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार, 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत इच्छुकांना नामनिर्देशन (Nomination) अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजता अर्जांची छाननी होईल. आवश्यक असल्यास माघारीनंतर 1 जुलै रोजी मतदान होणार असून, बिनविरोध निवड झाल्यास त्याच दिवशी उपसभापतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Vidhan Parishad Deputy Chairman:  महायुतीकडे स्पष्ट बहुमत, उपसभापती पद पुन्हा शिंदे सेनेकडे?

विधान परिषदेत भाजपची सदस्यसंख्या सर्वाधिक असली, तरी महायुतीतील सत्तावाटपाच्या सूत्रानुसार उपसभापतीपद पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडेच जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या पदासाठी शिंदे गटातच मोठी चुरस निर्माण झाली आहे.

Vidhan Parishad Deputy Chairman:  नीलम गोऱ्हे आघाडीवर, पण तीन नावांची जोरदार चर्चा

माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत त्या शिवसेना शिंदे गटाकडून बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्याच गळ्यात उपसभापतीपदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पक्षांतर्गत चर्चेत कृपाल तुमाने, चंद्रकांत रघुवंशी आणि मनीषा कायंदे यांचीही नावे पुढे आली आहेत. त्यामुळे अंतिम क्षणापर्यंत उत्सुकता कायम राहणार आहे.

Vidhan Parishad Deputy Chairman:  शिंदे पुन्हा धक्कातंत्र वापरणार? 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपसभापतीपदासाठीही शेवटच्या क्षणी नवा चेहरा पुढे करून राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांची पुन्हा वर्णी लागणार की शिंदे आणखी एखाद्या नेत्याला संधी देणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे (MVA) विधान परिषदेत आवश्यक संख्याबळ नसल्याने विरोधक उमेदवार देणार की निवडणूक बिनविरोध होणार, याबाबतही उत्सुकता आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. आता 30 जून रोजी कोणकोण उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि अखेर 1 जुलैला उपसभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Pune Nasrapur Case: नसरापूरच्या नराधमाला फाशी, एकनाथ शिंदे म्हणाले, केतन अग्रवाल केसही फास्टट्रॅकवर घेऊ!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *