बारामती: अजित पवार यांच्या विमान अपघाताला आणि निधनाला 5 महिने झाले. उपमुख्यमंत्रीपदासह अर्थखात्याचीही जबाबदारी अजित दादांच्या खांद्यावरती होती. मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर जवळच अर्थसंकल्प असल्याने अर्थखात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) यांनी स्वत:कडे ठेवलेली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांनी अर्थसंकल्पही सादर केला होता. मात्र त्यानंतर हे खात राष्ट्रवादीकडे (NCP) देण्यात येण्याची शक्यता होती, मात्र अद्यापही अर्थखात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं नाही. अशातच आता अर्थखात्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार (Jay Pawar) यांनी या खात्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना जय पवारांनी याबाबत वक्तव्य केलं आहे.
Jay Pawar : नेमकं काय म्हणालेत जय पवार?
बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना जय पवार यांनी म्हटलं की, देशातील सर्वात जास्त मतांनी सुनेत्रा पवार निवडून आल्याने सर्वांचे मनापसून आभार व्यक्त करतो. दादा आपल्याला लवकर सोडतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. अर्थ खातं आपल्याकडे नसल्याने विकासकामे रखडली आहेत असं बोललं जात पण तसे नाहीये. दादा आपल्याला सोडून गेले. दादा गेल्यानंतर अर्थसंकल्प मांडायचा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवले अर्थखाते त्यांच्याकडे घेतलेले आहे.
आता काही दिवसांपूर्वी पार्थ दादांची, सुनेत्रा वहिनींची आमची तशी चर्चा झाली, मुख्यमंत्री बोलले की, लवकरात लवकर आपलं अर्थखातं आपल्याकडे येईल आणि दादांची जी भविष्यातील विकास कामांचं स्वप्न होतं, ते आपण पूर्ण करूया असं देखील पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी म्हटलं आहे. मी दादांसारख काम करण्याचा प्रयत्न करेन, तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करेन असंही ते पुढे म्हणालेत.
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा