Gadchiroli Crime News : पतीने संतापाचे टोक गाठलं, पत्नीच्या दुचाकीला धक्का देऊन खाली पाडलं, अन् भररस्त्यात…; गडचिरोलीच चामोर्शी हादरलं!


Gadchiroli Crime News : गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील बामणपेठजवळ पतीने पत्नीवर धारदार चाकूने सपासप वार करत जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात कनिका दास या गंभीर जखमी (Gadchiroli Crime News)  झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आरोपी पती ब्रजकेश दास याने बामणपेठ जंगल मार्गावर पत्नी प्रवास करत असलेल्या दुचाकीला धक्का देऊन तिला खाली पाडले. त्यानंतर तिच्या हात, पाय, पोट आणि मानेवर धारदार चाकूने सपासप (Crime News) वार करून तो घटनास्थळावरून फरार झाला.

दरम्यान, या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी महिलेला तातडीने आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना गडचिरोली रेफर करण्यात आले आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून आष्टी पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.

Buldhana Crime News : जानेफळ गावात दोन सराफा दुकानांवर चोरट्यांचा डल्ला; 1.43 लाखांचे चांदीचे दागिने लंपास

बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ येथील मुख्य मार्गावरील दोन सराफा दुकानांमध्ये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दुकानफोडी करत सुमारे 1 लाख 43 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास केले. देऊळगाव साकर्शा मार्गावरील साईराम ज्वेलर्स आणि माऊली ज्वेलर्स या दुकानांचे शटर तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. यामध्ये सुमारे 681 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरीला गेल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस, फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे यांनीही भेट देत पाहणी केली. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Buldhana Police : शेगाव रेल्वे पोलिसाचे अंगावर काटा आणणारे धाडस, मृत्यूच्या दाढेतून प्रवाशाचे वाचवले प्राण.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानकावर कर्तव्यदक्षतेचा आणि धैर्याचा एक थरारक प्रसंग नुकताच पाहायला मिळाला. समोरून येणाऱ्या वेगवान रेल्वेची पर्वा न करता, स्वतःचा जीव धोक्यात घालून एका प्रवाशाचे प्राण वाचवणारे शेगाव रेल्वे पोलीस दलातील पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग वसु सध्या सर्वांच्या कौतुकाचा विषय बनले आहेत. शेगाव रेल्वे स्थानकावर रात्रीच्या वेळी नेहमीप्रमाणे प्रवाशांची वर्दळ सुरू असताना एक प्रवासी अचानक अनपेक्षितपणे रेल्वे ट्रॅकवर पडला. त्याच वेळी समोरून अत्यंत वेगाने एक्सप्रेस रेल्वे येत होती. हा काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग पाहून स्टेशनवरील उपस्थितांची भितीने चांगलीच धांदल उडाली. पुढे जाऊन प्रवाशाला वाचवण्याची हिंमत कोणाचीही होत नव्हती. क्षणभरातच मोठा अनर्थ घडणार असे चित्र दिसत होते.

दरम्यान, कर्तव्यावर असलेले रेल्वे पोलीस कर्मचारी पांडुरंग वसु यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी थेट रेल्वे ट्रॅकवर उडी घेत, समोरून येणारी काळ बनलेली रेल्वे काही अंतरावर असतानाच त्यांनी ट्रॅकवर पडलेल्या प्रवाशाला घट्ट पकडून अत्यंत वेगाने बाजूला खेचले. वसु यांनी प्रवाशाला सुरक्षित बाहेर काढताच अवघ्या काही सेकंदांत रेल्वे तिथून धडधडत निघून गेली. पांडुरंग वसु यांनी दाखवलेल्या या अचाट धैर्यामुळे एका निष्पाप व्यक्तीला जीवदान मिळाले असून, एका कुटुंबाचा मुख्य आधार वाचला आहे.. त्यांच्या या अतुलनीय शौर्याचे आणि तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *