Last Updated:
यावेळी एका सतर्क महिलेनं संशय आल्याने त्यांची चौकशी केली. हे चारही तरुण या कॅप्सूल इम्युनिटी बूस्टर आणि पेन किलर असल्याचं सांगितलं.
मुंबई: महाराष्ट्राची राजधानी असलेल्य मुंबईमध्ये एका धक्कादायक प्रकारमुळे संपूर्ण देश हादरला आहे. भायखळा परिसरात मोहरमदरम्यान नागरिकांना ‘पेन किलर’ गोळ्या असल्याचे सांगून चक्क उंदीर मारण्याचे औषध देऊन १५ हजार लोकांना मारण्याचा कट उघड झाला आहे. पोलिसांनी आरोपीला पकडलं आहे. या प्रकरणी आता प्रत्यक्षदर्शी समोर आले आहे. त्यांनी घटनास्थळी काय घडलं हे सांगितलं आहे.
भायखळा झिंक फॉस्फईड कॅप्सूल प्रकरण आरोपी फय्या प्रेमजी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याने मोहर्रमच्या मिरवणुकीदरम्यान मुंबईतील रे रोड परिसरात कॅप्सुल वाटप केलं होतं. रेहमताबाद कब्रस्तानाजवळ चार जण मिरवणुकीत सहभागी नागरिकांना कॅप्सूल वाटत असल्याची माहिती समोर आली आहे.
यावेळी एका सतर्क महिलेनं संशय आल्याने त्यांची चौकशी केली. हे चारही तरुण या कॅप्सूल इम्युनिटी बूस्टर आणि पेन किलर असल्याचं सांगितलं. मात्र, या महिलांना त्या तरुणावर संशय आला. त्यांनी तिथेच कॅप्सूल उघडून पाहिल्यानंतर त्यात फिकट रंगाची पावडर आढळल्याने महिलेनं तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात कॅप्सुल आढळल्या. पोलिसांनी सगळा साठा जप्त केला. या प्रकरणी फय्याज प्रेमजी याला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, भायखळा झिंक फॉस्फईड कॅप्सूल प्रकरण आरोपी फय्याज निसार हुसेन प्रेमजी याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
फयाजने 50 किलो झिंक फॉस्फाईडची ऑर्डर दिली होती. झिंक फॉस्फाईडचा वापर हा उंदीर मारण्याच्या गोळ्यांमध्ये केला जातो. काही दिवसांपासून तो राहत्या घरी एक एक ग्रॅम विष टाकून कॅप्सूल तयार करत होता. मोहरमला टार्गेट करण्याचा त्याचा हेतू होता. त्याने 2025 मध्ये इराण आणि इराकचा प्रवास केला होता. त्याच्याकडून 14900 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. तर 30000 कॅप्सूल तयार करण्याचे त्याचे लक्ष्य होते. त्या कॅप्सूलचे वितरण झाले नाही. पोलिसांमुळे मोठा कट उधळला. आतापर्यंत 11 ते 12 लोकांनी कॅप्सूल खाल्ल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीन जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला असून मात्र उर्वरित लोकांवर अजूनही उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती गंभीर आसल्याची असून हा आकडा वाढण्याची भीती आहे.
Mumbai,Maharashtra
Jun 27, 2026 11:43 PM IST
Zinc Capsule Case: कॅप्सूलमध्ये फिकट रंगाचं पावडर होतं आणि…, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं मोहरममध्ये काय घडलं?
