Rohini Khadse : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून 2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आज उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला (TET Exam 2026 Peper Leak) आहे. टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द (TET Exam Cancle) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना त्यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना सल्ला दिली आहे.
टीईटी पेपरफुटीचा उगम हा ठाण्यात आढळलाय, विचार करा
देवेंद्र फडणवीस साहेब, जरा सावध व्हा, जागे व्हा ! मुख्यमंत्री पदाची माळ स्वतःच्या गळ्यात घालण्यास कुणीतरी फार उत्सूक आहे ! असा सल्ला वजा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. खडसे यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ दिला आहेत. त्यात त्या म्हणाल्या की, आधी ‘ऑपरेशन टायगर’ करून उद्धवजी ठाकरे यांचे सहा खासदार फोडले आणि खासदारांच्या संख्येत वाढ करून स्वतःच्या पक्षाला महायुतीतील एक नंबरचा पक्ष केले. इतकं करुनही मुख्यमंत्री पद मिळत नाही, म्हणून तर तुमच्या सरकारला बदनाम करण्यासाठी तर टीईटीचे पेपर फोडले गेले नाही ना ? कारण टीईटी पेपरफुटीचा उगम हा ठाण्यात आढळलाय. विचार करा… जागे व्हा देवेंद्र फडणवीस साहेब जागे व्हा… असे त्या म्हणाल्या.
संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून 2026 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आज उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला (TET Exam 2026 Peper Leak) आहे. टीईटीचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द (TET Exam Cancle) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांआधी NEET चे पेपर फुटल्याने संपूर्ण देश हादरला होता. या नीट परिक्षेच्या पेपरफुटीमागे महाराष्ट्रातील प्रमुख आरोपी समोर आले होते. त्यानंतर आता पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षाचे पेपर फुटल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे.
टीईटीचा पेपर कसा फुटला, नेमकं काय घडलं? (TET Peper Leak TET Exam Cancle)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 घेण्याचे प्रस्तावित होते. NEET 2026 च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. तथापि, आज 27 जून, 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून 2026 परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा ‘तो’ जुना व्हिडिओ