Ketan Agarwal:…तर सिया आणि चेतन सुटू शकतात? केतनच्या वडिलांनी हात जोडून केलं आवाहन | पुणे बातम्या (Pune News)


Last Updated:

“त्या दिवशी लोहगडावर घटनास्थळी जे कुणी उपस्थित असतील त्यांनी पुढे आलं पाहिजे. कारण, केतनला दरीत ढकलताना प्रत्यक्ष पाहिलेल्या

News18
News18

केतन अग्रवाल हत्या प्रकरणी दररोज नव नवीन खुलासे होते. शिया आणि चेतनने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी केतनला कसं ढकललं याबद्दल सगळं काही पोलिसांनी सांगितलं आहे. पण, ही केस अजूनही पूर्ण झालेली नाही. केतन अग्रवालचे वडील  विशाल अग्रवाल यांनी त्या दिवशी लोहगडावर असलेल्या साक्षीदारांनी समोर यावं, पोलिसांना जबाब द्यावा, असं हात जोडून आवाहन केलं आहे.

लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी नागरिक आणि केतनच्या कुटुंबीयांनी कॅण्डल मार्च काढला. या वेळी केतनचे वडील विशाल अग्रवाल हे सुद्धा मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी महत्त्वाचं आवाहन केलं.

“त्या दिवशी लोहगडावर घटनास्थळी जे कुणी उपस्थित असतील त्यांनी पुढे आलं पाहिजे. कारण, केतनला दरीत ढकलताना प्रत्यक्ष पाहिलेल्या साक्षीदारांनी पुढे येऊन सत्य समोर आणावे हे गरजेचं आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कथित कृत्याबाबत सत्य उघड करण्यासाठी साक्षीदारांनी निर्भयपणे पुढे यावे, असं आवाहन विशाल अग्रवाल यांनी केलं.

‘साक्षीदारांना त्रास होणार नाही’

“माझ्या केतनाला न्याय मिळावा, यासाठी सगळे लोक आले, आमच्या दुखामध्ये सामील झाले, त्यांचा खूप आभारी आहे. सगळ्यांनी मिळून न्याय दिला पाहिजे. हे सगळे त्या लोकांकडे पोहोचलं पाहिजे, जे लोक त्या दिवशी लोहगडावर होते. सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे. खूप लोक मेसेज पाठवत आहे. आम्ही तिथे होतो, आम्ही त्यांना पाहिलं असं सांगत आहे. पण, ती लोक पोलिसांना घाबरत आहे. माझ्या मुलांनाा न्याय देण्यासाठी सगळ्यांनी पुढे यावरं, सगळ्यांनी यासाठी जबाब नोंदवावा. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी मदत करावी’ अशी मागणीही अग्रवाल यांनी केली,

मराठी बातम्या/पुणे/

Ketan Agarwal:…तर सिया आणि चेतन सुटू शकतात? केतनच्या वडिलांनी हात जोडून केलं आवाहन



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *