Last Updated:
आर्यलंडच्या पुरुष संघाचा हा भारताविरूद्ध पहिलाच विजय होता.त्यामुळे आर्यलंडने मोठा उलटफेर केला होता. यानंतर आज आयर्लंडच्या महिला संघाने वेस्ट इंडिजचा संघाचा 6 विकेट राखून पराभव केला आहे.
Ireland Team : शुक्रवारी टी20 चॅम्पियन ठरल्यानंतर पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या टीम इंडियाचा आर्यलंड संघाने अवघ्या 34 धावांनी लाजिरवाणा पराभव केला होता.आर्यलंडच्या पुरुष संघाचा हा भारताविरूद्ध पहिलाच विजय होता.त्यामुळे आर्यलंडने मोठा उलटफेर केला होता. यानंतर आज आयर्लंडच्या महिला संघाने वेस्ट इंडिजचा संघाचा 6 विकेट राखून पराभव केला आहे. आर्यलंडचा हा टी20 वर्ल्डकप मधला पहिलाच विजय होता. त्यामुळे त्यांनी देखील वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर केला आहे.त्यामुळे आर्यलंडचा हा 24 तासात मोठा उलटफेर केला आहे. तसेच आयर्लंडच्या या विजयाने ग्रुप बीच संपूर्ण समीकरण बदललं आहे.
आर्यलंडच्या महिला संघाचा टी20 वर्ल्डकपमध्ये मागच्या चारही सामन्यात पराभव झाला होता.आता त्यांचा ग्रुपमधला शेवटचा सामना हा वेस्ट इंडिज विरूद्ध होता. हा सामना जिंकून वेस्ट इंडिज सेमीफायनलला पोहोचू शकली असती. पण आर्यलंडने आज त्याचा पराभव केला होता.
खरं तर वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 128 धावा ठोकल्या होत्या.त्यामुळे आर्यलंडसमोर 129 धावांचे लक्ष्य होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना ओरला प्रेडंरगस्टने 63 धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर आर्यलंडने हे लक्ष्य 18.1 ओव्हरमध्ये पूर्ण करत हा सामना 6 विकेट राखून जिंकला होता.
तर वेस्ट इंडिजकडून चिनेले हेन्रीने सर्वाधिक 27 धावा केल्या होत्या.या व्यतिरीक्त कुणालाच मोठ्या धावा करता आल्या नाही.त्यामुळे वेस्ट इंडिज फक्त 128 धावाच करू शकली होती. पण आता आर्यलंडने हे लक्ष्य पुर्ण करून हा सामना 6 विकेटने जिंकला आहे.आयर्लंडने हा सामना जिंकून टी20 वर्ल्डकपचा सगळा इतिहास बदलला आहे.कारण याआधी कधीच आयर्लंड टी20 वर्ल्डकपमध्ये सामना जिंकू शकली नव्हती. पण हा सामना जिंकून त्यांनी उलटफेर केला.
आयर्लंडच्या विजयाने समीकरण बदललं
खरं तर आर्यलंडला वेस्ट इंडिज विरूद्ध विजयाने काहीच फायदा झाला नाही.कारण ते आधीच वर्ल्ड कपमधून एलिमिनेट झाले होते.तर वेस्ट इंडिजला या पराभवाचा मोठा धक्का बसला आहे.कारण या विजयासह वेस्ट इंडिजच सेमी फायनलचा स्थान पक्क झालं होतं.
ग्रुप बीमध्ये इंग्लंड एकटीच टीम सेमी फायनलला पोहोचली आहे.त्या व्यतिरीक्त वेस्ट इंडिज आणि न्युझीलंडला पोहोचायची संधी आहे. वेस्ट इंडिजचे पाचही सामने पार पडले आहेत. यात त्यांचे 5 सामन्यात 6 गुण आहे, आणि नेट रनरेट -0.147 आहे. तर न्युझीलंडचे 4 सामन्यात 4 गुण आहेत, आणि त्यांचा नेट रनरेट हा +0.122 आहे.
आता न्यूझीलंडचा शेवटचा सामना हा इंग्लंड विरूद्ध आहे.जर न्यूझीलंडने इंग्लंडला हरवलं तर ते सेमी फायनलला पोहोचतील.पण जर इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला.तर वेस्ट इंडिज 6 गुणांसह सेमी फायनलला पोहोचेल.त्यामुळे ग्रुप बीमधून कोणती टीम सेमी फायनलला पोहोचते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Mumbai,Maharashtra
Jun 27, 2026 11:49 PM IST
