IND vs IRE 2nd T20: वैभव सूर्यवंशीचं पदार्पण लांबणीवर? श्रेयस अय्यर मोठा निर्णय घेणार, दुसऱ्या टी 20 साठी संभाव्य प्लेईंग इलेव्हन


IND vs IRE 2nd T20 बेलफास्ट : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी 20 सामना उद्या होणार आहे. आयर्लंडनं पहिल्या सामन्यात भारतावर विजय मिळवत 440 चा वोल्टचा धक्का दिला. आक्रमक फलंदाजांचा संघात समावेश असून देखील भारताला आयर्लंड विरुद्ध 34 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बेलफास्टमध्ये आयर्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 182 धावा केल्या होत्या. भारताला विजयासाठी 183 धावा करायच्या होत्या. मात्र, भारताचा संघ 18.5  ओव्हरमध्ये 148 धावांवर आटोपला. भारतावरील आयर्लंडचा हा पहिला विजय होता. आता दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियात बदल होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.  

आयर्लंड कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरणार

विशेष बाब म्हणजे भारताविरोधात आयर्लंडच्या संघाचे प्रमुख सहा खेळाडू खेळत नाहीयेत. आयर्लंडचा संघ नव्या खेळाडूंसोबत मैदानात उतरला आहे. युवा खेळाडूंनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. भारतातील राजस्थान येथी वेगवान गोलंदाज जय मूंदरा आयर्लंडकडून खेळतोय.  त्यानं 25  धावा देत 2 विकेट घेतल्या. आयर्लंड दुसऱ्या सामन्यात कोणताही बदलाशिवाय मैदानात उतरेल.  

वैभव सूर्यवंशीला पदार्पणासाठी वाट पाहावी लागणार?

दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियात वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची संधी कमी मानली जातेय. एका पराभवामुळं श्रेयस अय्यर फलंदाजी क्रमात बदल करणार नाही. मात्र, गोलंदाजीत एक बदल केला जाऊ शकतो. प्रसिद्ध कृष्णाची जागा फिरकी गोलंदाज रवि बिश्नोई घेऊ शकतो. त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतो. 

दरम्यान, श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वातील पहिलाच सामना भारतानं गमावला. टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. यापूर्वी 2024 मध्ये देखील भारताचा झिम्बाब्वे विरोधात पराभव झाला होता. तर, 17 वर्षांच्या इतिहासात आयर्लंडनं भारतावर पहिल्यांदा विजय मिळवला आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवण्याचा प्रयत्न श्रेयस अय्यरची टीम इंडिया करेल. 

भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11 – अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, रवि बिश्नोई.

आयर्लंड संघाची प्लेइंग 11 – टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), बेंजामिन कॅलिट्झ, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, लियाम मॅकार्थी, मॅथ्यू हम्फ्रे, जय मुंद्रा, मॅथ्यू हॉलार्ड.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *