Vithabai Narayangaonkar: स्व. विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar). तमाशासम्राज्ञी (Lavani Legend) आणि लोककलावंत. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोककलेसाठी वाहिलं. त्यांच्या आयुष्यात बरेच चढ उतार आले. विठाबाई्ंच्या जीवनावर आधारीत लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात (Eetha) मुख्य भूमिकेत श्रद्धा कपूर झळकणार असून, तिनं ही भूमिका जीव ओतून साकारली आहे. लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित या सिनेमातून त्यांचा जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे. टीझरला प्रेक्षकांकडून जबरदस्त रिस्पॉन्स (Shraddha Kapoor) मिळत आहे. पण विठाबाईंच्या आयुष्यात एक वेदनादायी आणि दु:खद सत्यही दडले आहे.
विठाबाईंच्या आयुष्याचा शेवट कसा झाला? (Tamasha Queen Vithabai Narayangaonkar)
विठाबाई नारायणगावर यांची ओळख महान तमाशा सम्राज्ञी म्हणून होती. लोककला विश्वात त्याचं नाव आदराने घेतले जात होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोककलेसाठी वाहून दिलं होतं. लोककलेसाठी त्यांचे योगदान खूप मोठे होते. त्यांनी तमाशा कलावंतांच्या कल्याणासाठीही लढा दिला. मात्र, तरीही त्यांच्या आयुष्याचा शेवट हा वेदनादायी होता. मराठी लोककलेसाठी अहोरात्र झटणाऱ्या विठाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाकडे रुग्णालयाचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते, अशी माहिती आहे. पक्षाघाताचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मात्र, 74 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. रिपोर्ट्सनुसार, विठाबाईंच्या नातेवाईंकाना शेवटी रुग्णालयाचे बिल भरण्यास अडचण निर्माण झाली होती.5,900 रुपये जमा करताना त्यांना अडचण निर्माण झाली होती. तसेच शेवटचे विधी पूर्ण करण्यासाठी त्यांचा मृतदेह गावी नेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. माहितीनुसार, विठाबाईंच्या मुलीला आणि त्यांच्या मुलाला 4000 रुपयेही जमवता आले नव्हते. सोशल वर्कर आणि केईएम रुग्णालयाचे ट्रस्टी डॉ. बानो कोयाजी यांनी रुग्णालयाने कमी शुल्क आकारावे याची खात्री केली होती.
त्यांचे कुटुंब तेव्हा आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याची माहिती आहे. हा खर्च विठाबाईंच्या कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होते. अखेरीस त्यांच्या मदतीला काही लोक धावून आलीत. काही काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते, मराठी नाट्य परिषदेतील काही सदस्य आणि काही त्यांच्या चाहत्यांनी त्यांचं रुग्णालयातील बिल भरण्यास मदत केली. त्यांचं लोककलेसाठी असलेलं योगदान अतुलनीय आहे. पण शेवटच्या काळात त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.
तमाशा घराण्यात जन्म
माहितीनुसार, विठाबाई नारायणगावकर यांचा जन्म तमाशा कुटुंबात झाला. घराला लोककलेचा वारसा लाभल्यामुळे त्यांनी लहानपणीपासून तमाशाचे धडे गिरवले. त्यांनी लावणी आणि तमाशाला उच्च दर्जा दिला. तसेच आपली कला सातासमुद्रापार पोहोचवली. लोककलेच्या योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष