Baba Vanga Prediction : बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी केलेली भाकितं अनेकदा खरी ठरली आहेत. काही शतकांपूर्वी, त्यांनी सांगितलेली अनेक भाकितं आतापर्यंत खरी ठरली आहेत. आणि तितकीच ती व्हायरल देखील झाली आहे. कारण त्यांच्या रहस्यमय भविष्यवाणीसाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगा यांच्याबद्दल लोकांमध्ये अजूनही खूप उत्सुकता आहे. अशात 29 जून ते 5 जुलै 2026 या आठवड्यासाठी त्यांनी केलेले भविष्यकथन सध्या चर्चेचा विषय बनले आहे. पुढच्या 7 दिवसांत 5 राशींसाठी हा काळ फार भाग्यशाली असणार आहे. या काळात कोणत्या राशींना फायदा होण्याची शक्यता आहे जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, 29 जून ते 5 जुलैचा कालावधी मेष राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये जाण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील. नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
बाबा वेंगाच्या म्हणण्यानुसार, नवीन आठवड्यात तुम्हाला अनेक नवीन गोष्टींचे शुभ संकेत मिळतील. जर तुम्हाला वाहन किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. या आठवड्यात प्रवासाचे योगदेखील आहेत. तुमच्या मित्रांकडून तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, घरातील वातावरण आनंदी असणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, जुलैच्या पहिल्या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास चांगला वाढेल. नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. तसेच, नवीन प्रोजेक्टची सुरुवात करण्यावर तुम्ही भर द्याल. मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला नोकरी मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आत्मविश्वासाचा असणार आहे. या कालावधीत तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. कामाच्या काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. पण, त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाल. घरातील वातावरण प्रसन्न असणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. नोकरीच्या अनेक संधी तरुणांपुढे निर्माण होतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमच्या प्रयत्नांना चांगलं यश मिळेल. आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जुलैचा पहिला आठवडा चांगला की वाईट? 6 पैकी 3 राशी ठरतील लकी, साप्ताहिक राशीभविष्य
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report