मित्रानेच पत्नीला नराधमाच्या हवाली केलं; पतीने काटा काढून थेट प्रयागराज गाठलं, खाकीने ‘रिक्षावाला’ बनून 21 वर्षांनंतर ठोकल्या बेड्या | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

Shocking Crime Incident : 21 वर्षांनतर एक केस अचानक पुन्हा चर्चेत आली. तपासाच्या धाग्यांवर सातत्याने काम करत असलेल्या पोलिसांना अखेर महत्त्वाचा सुगावा लागला. त्यानंतर आखलेल्या गुप्त तपासाचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

२१ वर्षांपूर्वी पुरावा न सोडता पळालेला पती अखेर अडकला
२१ वर्षांपूर्वी पुरावा न सोडता पळालेला पती अखेर अडकला

विरार : अनेकदा एखादा गुन्हा काळाच्या पडद्याआड गेला असे वाटते. बरीच वर्षानुवर्षे कोपऱ्यात असलेली एक फाईल अचानक उघडते आणि तपासाची नवी दिशा समोर येते. सध्या अशाच एका जुन्या प्रकरणात पोलिसांनी सातत्याने शोध घेत अखेर मोठे यश मिळवलेले आहे.

नेमकं घडलं काय होतं?

मिळालेल्या माहितीनुसार, विरारच्या आगाशी येथे दिलीप चव्हाण याचा 2005 साली खून करण्यात आला होता. मात्र खुन्याने कोणताही पुरावा मागे न ठेवता बिहारमधून पिस्टल आणून पिस्टलच्या दट्ट्याने मारून त्याचा खून करण्यात आला आणि विरारच्या आगाशी भाटीबंदर खाडीच्या किनारी फेकून दिला. मात्र वसईच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनने आरोपीला प्रयागराज येथून रिक्षा चालक बनून अटक केली आहे.

हत्येमागील कारण काय?

आरोपी राजेश सोनकर हा अर्नाळा मधील एका हॉटेलमध्ये काम करत होता . त्याचं एका मुलीशी प्रेम संबंध झाले आणि त्याने लग्न केलं. काही दिवसानंतर ज्या हॉटेलमध्ये तो काम करायचा त्या हॉटेल मालकाची नजर त्याच्या पत्नीवर पडली त्याने त्याच्याकडे काम करणारा मॅनेजर दिलीप तुकाराम चव्हाण याला त्याच्या बायकोला आणायला सांगितले. दिलीपने राजेशच्या बायकोला घेऊन त्याच्या मालकाकडे घेऊन गेला आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला.

ही गोष्ट त्या महिलेने आपल्या पतीला म्हणजेच राजेशला सांगितले त्याचा संताप अनावर झाला आणि त्याने दिलीप चव्हाणला पार्टी करूया असं सांगून भाटी बंदर ते चिखल डोंगरीकडे जाणाऱ्या बंधार्‍यावरील रोडच्या बाजूला आगाशी भाटी बंदर गावच्या हद्दीत खाडी किनारी फेकून दिला.तेव्हापासून तो फरार होता.

21 वर्षे फरार असणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी

मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंत्रे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 2, वसईचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे, अजित गिते तसेच संजय नवले, मुकेश पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, जगदीश गोवारी, दादा आडके, अनिल साबळे, अक्षय बांगर, रामेश्वर केकान आणि संतोष चव्हाण यांच्यासह गुन्हे शाखा कक्ष 2 आणि सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी करीत आरोपी राजेश सोनकरचा माग काढण्यात आला.

नाव बदललं, शहर बदललं

गेल्या पंधरा वर्षापासून तो प्रयागराजमध्ये इ रिक्षा चालवत होता त्याने आपलं नाव बदलून तो त्या ठिकाणी राहत होता.यावेळी पोलिसांनी रिक्षा चालक बनून अखेर राजेश सोनकर ला पकडण्यात यश आल असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने त्याच्या पत्नीवर अत्याचार केल्यामुळे दिलीपचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

मराठी बातम्या/मुंबई/

मित्रानेच पत्नीला नराधमाच्या हवाली केलं; पतीने काटा काढून थेट प्रयागराज गाठलं, खाकीने ‘रिक्षावाला’ बनून 21 वर्षांनंतर ठोकल्या बेड्या



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *