IRE vs IND 1st T20i : टीम इंडिया उलटफेरची शिकार, आयर्लंडकडून 34 धावांनी धुव्वा, पराभवाला जबाबदार कोण? – Marathi News | ire vs ind 1st t20i ireland make big upset beat india by 34 runs at belfast


श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात टीम इंडियाला आयर्लंड दौऱ्यातील पहिल्याच टी 20i मॅचमध्ये उलटफेरचा सामना करावा लागला आहे. आयर्लंडने वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियावर 34 धावांनी मात करत 2 सामन्यांच्या टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली आहे. आयर्लंडने टीम इंडियासमोर 183 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाला विजयी धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरही खेळता आलं नाही. आयर्लंडने टीम इंडियाला 7 बॉलआधी ऑलआऊट केलं. आयर्लंडने टीम इंडियाला 18.5 ओव्हरमध्ये 148 रन्सवर गुंडाळलं. आयर्लंडने अशाप्रकारे टीम इंडिया विरुद्ध टी 20i क्रिकेटच्या इतिहासातील पहिलावहिला विजय मिळवला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *