नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवर संतापले आहेत. इराणकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका कर्मशिअल जहाजावर 25 जूनला क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी वक्तव्य केलं आहे. ट्रम्प म्हणाले की इराणनं हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं तीन ड्रोन हल्ले रोखले आहेत.
इराणवर शस्त्रसंधी मोडल्याचा आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल वर पोस्ट केली आहे. इराणकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर किमान चार एकतर्फी ड्रोनचा हल्ले करण्यात आलेत. यात एक ड्रोन थेट महागड्या कर्मशिअल जहाजावरील वरील भागावर आदळला. या हल्ल्यात जहाजाचं नुकसान झालं मात्र ते निघून जाण्यात यशस्वी ठरलं. इतर तीन ड्रोन अमेरिकेच्या सैन्यानं हवेतच पाडले. ट्रम्प यांनी इराणनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं म्हटलं.
इराणनं दिलेली धमकी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य अशावेळी आलेय, ज्यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेनं होर्मुझच्या मार्गात अडकलेल्या जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम थांबवलं आहे. वॉल स्ट्रीट जर्नल आणि रॉयटर्सनं अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं इराणच्या आयआरजीसीनं जहाजांवर हल्ला केल्याचं म्हटलं. हा हल्ला इराणनं दिलेल्या इशाऱ्यानंतर झाला आहे. इराणनं जहाजांनी निश्चित मार्गानं न गेल्यास हल्ला करण्याचा इशारा दिला होता.
ब्रिटीश नौसेनेची एजन्सी UKMTO नुसार , ओमानच्या किनारपट्टीजवळ जहाजावर क्षेपणास्त्राचा किंवा ड्रोनचा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजाच्या कंट्रोल रुमच्या भागाचं नुकसान झालं आहे. मात्र, या हल्ल्यात कोणी जखमी झालं नाही. ज्या जहाजावर हल्ला झाला ते जहाज एवर लवली असून त्यावर सिंगापूरचा झेंडा लावला होता.
दरम्यान, अमेरिका आणि इस्त्रायल यांनी इराणवर 28 फेब्रुवारी पासून हल्ले सुरु केले होते. त्यानंतर 10 एप्रिलला अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाली. यानंतर दोन्ही देशांमधील वाटाघाटीनंतर 19 जूनला देशांमध्ये करारावर स्वाक्षरी करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आलेली. पाकिस्तानकडून अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्यात आली होती.
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!