Nashik Crime News: सोबत दारू प्यायली, नंतर दोघांमध्ये बाचाबाची, संतापलेल्या मित्रानेच मित्राला संपवलं; घटनेनं नाशिक हादरलं!


Nashik Crime News: नाशिक शहरातील देवळाली गाव परिसरात गुरुवारी रात्री घडलेल्या एका भयंकर घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. नेहमी एकत्र फिरणाऱ्या, सुख-दुःखात सोबत असणाऱ्या दोन मित्रांमध्ये मध्यरात्री मद्यपान करताना अचानक असा काही वाद झाला, ज्याचा शेवट अत्यंत थरारक आणि भयानक होईल, अशी कल्पना कोणीही केली नव्हती. क्षुल्लक कारणावरून झालेल्या शाब्दिक वादाचे पर्यवसान थेट एका मित्राच्या मृत्यूत झाले असून, संशयित आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल माळवे आणि योगेश गायकवाड हे दोघे देवळाली गावात राहणारे जीवाभावाचे मित्र होते. गुरुवारी रात्री ते नेहमीप्रमाणे एकत्र बसून मद्यपान करत होते. सुरुवातीला हसत-खेळत सुरू असलेल्या गप्पांमध्ये अचानक काही कारणावरून कटुता आली. दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. दारूच्या नशेत हा वाद इतका विकोपाला गेला की, योगेशचा स्वतःवरील ताबा सुटला. संतापाच्या भरात योगेश गायकवाड याने जवळच असलेले तीक्ष्ण हत्यार उपसले आणि विशाल माळवे याच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण होता की, वर्मी घाव लागल्याने विशालचा जागीच मृत्यू झाला.

Nashik Crime News: आरोपीला पोलिसांकडून बेड्या

या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर सोनवणे व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून विशालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवली आणि पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपी योगेश गायकवाड याला घटनेनंतर अवघ्या काही तासांतच ताब्यात घेतले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. काल रात्री त्या दोन मित्रांमध्ये असं नेमकं काय घडलं? कोणतं जुनं वैर समोर आलं की आणखी काही कारण होतं? या सर्व गुपितांचा शोध आता उपनगर पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे देवळाली गाव परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ketan Agarwal Death Case : लोहगडावरील केतन अग्रवालच्या आयुष्यातील ‘ती’ शेवटची 75 मिनिटं; सकाळी 9.20 ते 10.35 पर्यंत नेमकं काय घडलं?

Ketan Agarwal Death Case : “तुला जमणार नाही, मीच ढकलतो…”; पहिल्या दोन प्रयत्नांवेळी हताश होऊन चेतन रडू लागला होता, आरोपी सिया गोयलचा नवा दावा!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *