LPG Cylinder Supply: 30 जूननंतर नाही मिळणार गॅस सिलेंडर? सरकारची गाईडलाईन काय? – Marathi News | LPG Cylinder Supply No gas cylinders after June 30 What are the government guidelines


LPG Connection: अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार पुढे सरकल्यानंतरही आखाती देशभोवती अजूनही चिंतेचे वातावरण आहे. लेबनॉनवरील इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर शांतता नांदण्याची चिन्हं कमी झाली आहेत. दरम्यान व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचा आल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. तर समाज माध्यमांवर घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी मोठा दावा करण्यात येत आहे. समाज माध्यमावर व्हायरल दाव्यानुसार, 30 जून 2026 नंतर इंडेन, भारत गॅस आणि HP गॅस एलपीजी कनेक्शन बंद करण्यात येणार आहे. काय आहे याविषयीचे सरकारी मार्गदर्शक तत्त्वे? या दाव्यात किती आहे सत्य?

या दाव्यातील सत्य तरी काय?

होर्मूझ समुद्रधुनी संकटानंतर नंतर LPG पुरवठा विस्कळीत झाला होता. देशभरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना नियमित एलपीजी पुरवठ्यावर मोठा परिणाम जाला होता. सिलेंडरचा काळाबाजार होऊ नये यासाठी सरकारने मध्यंतरी काही निर्बंध लादले होते. त्यानंतर LPG आणि PNG कनेक्शन विषयी काही नवीन नियमही लागू केले होते. सरकार आणि तेल वितरण कंपन्यांनी (OMCs) ‘एक घर, एक गॅस कनेक्शन’ धोरण जाहीर केले होते. त्यानंतर आता 30 जून 2026 नंतर इंडेन, भारत गॅस आणि HP गॅस एलपीजी कनेक्शन बंद करण्यात येणार असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत होता. पण हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. सरकारने उलट आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर नियमित केल्याचे जाहीर केले आहे.

30 दिवसांचा काय नियम?

सरकारने एक नियम लागू केला आहे. त्यातंर्गत LPG वापर करणाऱ्यांना PNG कनेक्शन घेण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. त्यानंतर त्यांचे एलपीजी कनेक्शन बंद करण्यात येणार होते. पण हा नियम त्या ग्राहकांना लागू होतो, ज्यांनी पीएनजी कनेक्शनसाठी अर्ज केला आहे. ज्या परिसरात पीएनजी सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे सरसकट सर्वच ग्राहकांना हा नियम लागू नसल्याची माहिती आता समोर आली आहे. सामान्य ग्राहकांना नियमित गॅस पुरवठा सुरू होणार आहे.

25 मे 2026 रोजी नवीन संशोधनानुसार, (LPG Amendtment Order 2026) घरी जर पीएनजी कनेक्शन सुरु झाले असेल तर अशा ग्राहकांना 30 दिवसांच्या आत जुने एलपीजी सिलेंडर सरेंडर करावे लागते. हा नियम Indane, HP Gas आणि Bharat Gas सारख्या एलपीजी पुरवठा कंपन्यांना लागू आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पीएनजी सुविधा उपलब्ध आहे. त्यांना तीस दिवसांच्या आत त्यांचे एलपीजी सिलेंडर सरेंडर करावे लागणार आहे. निश्चित कालावधीत त्यांनी जर असे केले नाहीतर त्यांचे एलपीजी खाते बंद करण्यात येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *