Bollywood Most Unlucky Title Baaghi: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) सिनेमांच्या (Bollywood Films) नावांचा पुनर्वापर करण्याची प्रथा आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एखादं नाव लोकप्रिय ठरलं की, तेच नाव पुन्हा वापरण्याकडे निर्मात्यांचा कल असतो, जेणेकरून बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) पुन्हा एकदा तीच जादू निर्माण करता येईल. पण, एक असं अपशकुनी नाव ज्याच्यावर एक, दोन नाहीतर तब्बल 10 फिल्म्स तयार करण्यात आल्या. त्यातल्या तीन तर हिट ठरल्या, पण सात सुपरफ्लॉप (Superflop Films) झाल्या. असं असलं तरी हे नाव बॉलिवूडच्या दोन कलाकारांसाठी मात्र अत्यंत फायदेशीर ठरलं, जे पुढे जाऊन सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार बनले. आम्ही ज्या अपशकुनी नावाबाबत बोलतोय, ते म्हणजे, ‘बागी’ (Baaghi).
‘बागी’ (Baaghi Movie Title) हे नाव पहिल्यांदा 1939 मध्ये मोठ्या पडद्यावर झळकलं. त्याकाळी या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण प्रेक्षकांवर अपेक्षित प्रभाव पाडण्यात हा सिनेमा अपयशी ठरला. त्यानंतर 1953 आणि 1964 मध्येही याच नावाचे सिनेमे प्रदर्शित झाले, पण तोसुद्धा फ्लॉप झाले. ना कोणतीही चर्चा, ना कोणता गाजावाज, हे सिनेमे कधी आले आणि कधी गेले कुणाला थांगपत्ताच लागला नाही.
सलमान खानसाठी ‘बागी’ ठरला लकी (Baaghi Movie Title Lucky For Salman Khan)
बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि नगमा (Nagma) यांची मुख्य भूमिका असलेल्या आणि 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागी: अ रेबेल फॉर लव्ह’ (Baaghi: A Rebel for Love) सिनेमामुळे या नावाशी संबंधित चित्र बदललं. रोमान्स, ड्रामा आणि ॲक्शननं परिपूर्ण असलेल्या सिनेमाला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दिली आणि त्यातली गाणीही सगळीकडे लोकप्रिय झाली. या सिनेमानंतर सलमान खानच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आणि त्याच्या कारकिर्दीनं यशाच्या दिशेनं वेगानं वाटचाल सुरू केली.
पुन्हा एकदा नावानं दिला धोका (Baaghi Movie Title Superflop)
सलमान खानच्या सिनेमानंतर ‘बागी’ हे नाव सिनेमाच्या यशाची हमी ठरेल, असं वाटलं होतं. मात्र, तसं घडलं नाही. 2000 मध्ये संजय दत्तचा ‘बागी’ प्रदर्शित झाला, पण बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. याच नावानं 2005 मध्ये आणखी एक सिनेमा प्रदर्शित झाला, पण आज तो फारसा कोणाच्या लक्षात नाही. पुन्हा एकदा या नावाचं भवितव्य धोक्यात आल्याचं दिसलं.
टायगर श्रॉफमुळे बदललं अपशकुनी ठरलेल्या नावाचं नशीब
2016 मध्ये साजिद नाडियाडवाला यांनी ‘बागी’ एका नव्या रूपात सादर केलंय. टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांची जोडी असलेल्या सिनेमानं तरुणांचं लक्ष वेधून घेतलं. प्रेक्षकांना यातील दमदार ॲक्शन, धमाकेदार स्टंट्स आणि रोमँटिक बाजू खूप आवडली. त्यानंतर ‘बागी 2’ देखील प्रचंड यशस्वी ठरला. सिनेमानं टायगर श्रॉफची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि त्याला ॲक्शन सिनेमांच्या विश्वात एक प्रसिद्ध नाव बनवलं.
10 फिल्म्सपैकी केवळ 3 सिनेमे सुपरहिट (10 Films 3 Became Hits 7 Flopped At Box Office)
‘बागी’ (Baaghi) नावानं रिलीज झालेल्या 10 सिनेमांपैकी केवळ तीनच सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले, बाकीचे सात सिनेमे मात्र अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले. तरीही, बॉलिवूडमधील सर्वात लक्षवेधी टायटल्सपैकी एक म्हणून या नावाकडे पाहिलं जातं, कारण या नावानं काही सिनेमांना अपयशाच्या गर्तेत लोटलंय, तर सलमान खान आणि टायगर श्रॉफसारख्या कलाकारांना यशाच्या शिखरावरही पोहोचवलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष