Ketan Agrawal Case : सिया गोयल ‘फाशीच्या फंद्या’पर्यंत पोहोचणार, आरोपीच्या दुकानातील नोकर झाला ‘माफीचा साक्षीदार’, 18 जूनचा क्राईम प्लॅन उघड करणार


पुणे : पुण्याच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर (Lohagad Fort) व्यावसायिक केतन अग्रवाल याची दरीत ढकलून हत्या केल्याच्या प्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय आणि महत्त्वाचं वळण मिळालं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला (Pune Rural Police Crime Branch) या गुन्ह्यात एक ‘माफीचा साक्षीदार’ (Approver) मिळाला आहे. 

मुख्य आरोपी चेतन चौधरीच्या दुकानात काम करणाऱ्या नीरज कुमार नावाच्या कामगाराने पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. पोलीस सध्या त्याचा अधिकृत जबाब नोंदवून घेत आहेत. नीरजची ही साक्ष केतनच्या हत्येचा कट रचणारी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोर्टात सर्वात मोठा पुरावा ठरणार आहे.

Lohagad Case Mobile Swapping : हत्येच्या दिवशी चेतनने वापरला नोकराचा फोन

तपासादरम्यान समोर आलेले मोबाईल फोनचे डिटेल्स हेच या हत्येचे गुपित उघड करणारे ठरले आहेत. 18 जून या हत्येच्या दिवशी आरोपी चेतन चौधरीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःचे ‘लोकेशन’ लपवण्यासाठी एक शातीर चाल खेळली होती. 18 जून रोजी सकाळी सव्वासात वाजेपासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत, असे जवळपास 10 तास चेतन चौधरीने स्वतःचा मोबाईल त्याचा नोकर नीरज कुमारकडे ठेवला होता.

दिवसभरात चेतनच्या मोबाईलवर जेवढे फोन आले, ते सर्व फोन चेतनच्या सांगण्यावरून नीरजने उचलले. जेणेकरून चेतन पुण्यातच किंवा आपल्या दुकानातच हजर आहे, असा आभास निर्माण करता येईल. त्याचवेळी केतनची हत्या करण्यासाठी लोहगडावर गेलेल्या चेतनने स्वतःचा फोन न नेता नीरज कुमारचा मोबाईल सोबत नेला होता.

Ketan Agrawal Case : कोर्टात गुन्हा कसा सिद्ध होणार?

आरोपी चेतनने जरी स्वतःची ओळख लपवण्यासाठी हुडी घातली असली आणि स्वतःचा फोन पुण्यातच ठेवला असला, तरी तांत्रिक तपासात तो पूर्णपणे अडकला आहे. हत्येच्या दिवशी दिवसभर नीरजच्या फोनचे लोकेशन (Mobile Location Tracing) लोहगड किल्ला आणि त्याच्या आसपासच्या परिसरात ट्रेस झाले होते. आता नीरजने स्वतः दिलेल्या जबाबावरून हे सिद्ध झालं आहे की, तो फोन त्याच्याकडे नसून मालक चेतन चौधरीकडे होता.

या डिजिटल पुराव्यामुळे हत्येच्या वेळी चेतन चौधरी लोहगडावरच हजर होता आणि त्यानेच केतनला दरीत ढकलले, हे पोलिसांना न्यायालयात 100 टक्के सिद्ध करता येणार आहे.

Siya Goyal Lohagad Crime : सिया आणि चेतनच्या अडचणीत मोठी वाढ

लग्न मोडण्यासाठी आणि प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी सिया गोयल आणि चेतन चौधरीने आधी ‘साप आला’ असा बनाव रचत केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पासपोर्ट चोरून बालीचे प्री वेडिंग शूट रद्द केले आणि शेवटी 18 जूनला केतनचा काटा काढला. हा सर्व कट आता चेतन चौधरीचा विश्वासू नोकर नीरज कुमार याने पोलिसांसमोर उघड केल्यामुळे दोघांचीही तुरुंगातून सुटका होणे आता अशक्य मानलं जात आहे.

ही बातमी वाचा :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *