Alpha vs Eetha: बॉलिवूडमध्ये श्रद्धा कपूरचा ईठा’ अन् आलियाच्या ‘अल्फा’ चित्रपटावरून नवा रणसंग्राम! ईठाचा टिझर येताच चर्चेला उधाण


Alpha vs Eetha Bollywood Buzz: सध्या मनोरंजनसृष्टीत एकीकडे अभिनेत्री आलिया भट्टचा ‘अल्फा’ (Alpha) चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. तर दुसरीकडे लक्ष्मण उतेकर (Lakshman Utekar) दिग्दर्शित आणि श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) मराठमोळा अंदाज असणारा ‘ईठा’ (Eetha) चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतोय. एकीकडे YRF स्टुडिओच्या अल्फा चित्रपटाच्या चर्चेतच लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘ईठा’ चित्रपटाचा टिझर समोर आल्याने या दोन्ही चित्रपटांच्या स्पर्धेची चर्चा रंगली आहे.एका बाजूला आलिया भट हिचा बहुचर्चित ‘अल्फा’ तर दुसऱ्या बाजूला श्रद्धा कपूरचा दमदार कमबॅक समजला जाणारे ‘ईठा’ मुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता दिसत आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर प्रेक्षक नेमकं कोणाला निवडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आलिया भट्टचा अल्फा अन्  श्रद्धा कपूरच्या ईठामध्ये स्पर्धा?

खरंतर, अल्फाचा टिझर प्रदर्शित झाला होता तेव्हा बॉलीवूडच्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी आलिया भट्ट आणि संपूर्ण टीमचं मोठं कौतुक केलं होतं. पण सगळेच जण अल्फाच्या टीमचं कौतुक करताना दिसल्यामुळे अनेकांना हा एक पीआर कॅम्पेनचा भाग असल्याचं वाटलेलं. यामुळे आलिया भट्ट ला आणि अल्फाच्या टीमला ट्रोलिंगला सामोरे जावं लागलं. आता मॅडॉक फिल्म्सने याबाबतीत एक नवीन योजना आखली. त्यांनी ‘ईठा’ चा टिझर ‘कॉकटेल 2 ‘ चित्रपटाच्यामध्ये इंटरवलमध्ये दाखवला.  याचा परिणाम असा झाला की, आलिया भट्टच्या अल्फामधील भूमिकेवरून प्रेक्षकांचं लक्ष ‘ईठा’च्या टिझरमधील श्रद्धा कपूरच्या भूमिकेकडे गेलं. तिचं प्रचंड कौतुक होत आहे.

 

 

आलिया भट्ट सध्या आपल्या ॲक्शन अवतारामुळे चर्चेत आहे.पण दुसरीकडे श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ कडे तिच्या करिअरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट म्हणून पाहिलं जात आहे. दोन्ही अभिनेत्रींची स्टार पॉवर, फॅन फॉलोइंग आणि प्रोजेक्टची स्केल पाहता ही स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. बॉलीवूडमध्ये आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर यांची कायम तुलना केली जाते. अल्फा यापूर्वी 10 जुलैला प्रदर्शित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण मेकर्सने ही तारीख 3 जुलैला केल्यामुळे श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘अल्फा ‘ चित्रपटाचा बोलबाला निर्माण करण्यासाठी असं करण्यात आलं असल्याची चर्चा आहे. आलिया भट्टचा ‘अल्फा’ चित्रपट तीन जुलैला प्रदर्शित होणार आहे. तर श्रद्धा कपूरचा ‘ ईठा ‘ चित्रपट 28 ऑगस्ट ला प्रदर्शित करण्यात येणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *