Last Updated:
Red card for covering mouth : तुर्कीविरुद्धच्या वर्ल्ड कप मॅचमध्ये भांडण सुरू असताना तोंड झाकल्यामुळे रेड कार्ड मिळवणारा मिगुएल अल्मिरॉन हा पहिला खेळाडू ठरला. पॅराग्वेने तुर्कीचा 1-0 असा पराभव केला आहे.
Red card rules in football : फिफा वर्ल्ड कपमध्ये रंगतदार सामन्यांना सुरूवात झाली आहे. एकीकडे मेस्सी कमाल दाखवत असताना दुसरीकडे पराग्वे आणि तुर्किए यांच्यात शुक्रवारी रात्री खेळल्या गेलेल्या ग्रुप डी मधील मॅचमध्ये एका खेळाडूला विचित्र कारणासाठी मैदानाबाहेर जावं लागलं. पराग्वेचा मिडफील्डर मिगुएल अलमिरोन हा वर्ल्ड कप स्पर्धेत केवळ आपलं तोंड झाकल्यामुळं थेट रेड कार्ड मिळवणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. मॅचमध्ये नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
तोंडावर हात ठेवला अन्…
मॅच सुरू असताना पहिल्या हाफमध्ये एका खेळाडूला दुखापत झाली. त्यावेळी काही सेकंदासाठी खेळ थांबला होता. याचवेळी जेव्हा मिडफील्डजवळ एका फाउलनंतर अलमिरोन आणि मर्ट मुल्डर यांच्यात जोरदार वाद झाला. यावेळी अलमिरोनने मुल्डरशी बोलताना आपल्या तोंडावर हात ठेवला अन् काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, ज्यावर मुल्डरने ताबडतोब रेफरी इवान बार्टन यांच्याकडे दाद मागितली. त्यानंतर रेफरीने व्हिडीओ रेफरेन्स घेतला अन् नवीन नियमानुसार अलमिरोनला रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढलं.
नव्या नियमानुसार कारवाई
फिफामध्ये आणलेल्या नव्या नियमानुसार ही कारवाई केली गेली. या अनपेक्षित कारवाईनंतर पराग्वेच्या संघाला संपूर्ण मॅचमध्ये केवळ 10 खेळाडूंसह खेळावं लागलं. तरी देखील तुर्कीला विजय मिळवता आला नाही. माटियास गलार्झा याने मॅच सुरू झाल्यानंतर अवघ्या 65 सेकंदांच्या आत बॉल गोलपोस्टमध्ये धाडला. त्यामुळे पराग्वेच्या टीमला मॅच जिंकता आली.
आम्ही काहीही करू शकत नाही
पराग्वेचे मुख्य कोच गुस्तावो अल्फारो यांनी मॅच संपल्यानंतर या नवीन नियमावर आपली प्रतिक्रिया दिली. गुस्तावो अल्फारो म्हणाले की, नवीन नियमांनुसार जर तुम्ही मैदानावरील वादादरम्यान तोंड झाकले, तर तुम्हाला थेट मैदानाबाहेर जावे लागेल आणि यावर आम्ही काहीही करू शकत नाही. पराग्वेचा पुढील सामना गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार असून त्या मॅचमध्ये ग्रुपमधील दुसऱ्या स्थानाचा अंतिम निकाल लागेल.
Mumbai,Maharashtra
Jun 21, 2026 12:18 PM IST
FIFA वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं! तोंडावर हात ठेवल्यामुळं रेफरीने दिलं ‘रेड कार्ड’, LIVE मॅचमध्ये मोठा राडा
