Amol Kolhe on TRP Equation in Serial: गेल्या काही दिवसांपासून अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांची ‘मी सावित्रीबाई फुले’ (Mi Savitribai Jyotirao Phule)ही मालिका टीआरपीच्या नावाखाली बंद केल्याच्या वादामुळे चर्चेत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीने TRP आणि मालिकेला लागणारा खर्च याची गणिते जुळत नसल्याचं कारण देत मालिका उभ्या 152 एपिसोडमध्ये गुंडाळली. वाहिनीच्या या निर्णयामुळे प्रेक्षकांसह कलाकारांनाही मोठा धक्का बसलेला. अखेर अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांनी मालिका नव्याने youtube वर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. 20 जून रोजी म्हणजेच कालपासून ही मालिका ‘मराठी वारसा ‘ या यूट्यूब चॅनलवर सुरू झाली आहे. या मालिकेविषयी सांगताना डॉ अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी मालिकेच्या टीआरपीच्या गणितांविषयी कलाकाराला मिळणाऱ्या ‘पर डे’ विषयी अनेक धक्कादायक व महत्त्वाचे खुलासे केले.
Amol Kolhe: काय म्हणाले अमोल कोल्हे ?
डॉ अमोल कोल्हे म्हणाले,’एखादा कलाकार एखादी भूमिका करतो.तो ‘ Per Day’ ने काम करतो. जो अभिनेता चॅनलवर काम करतो, त्याला ‘ पर डे ‘ कुठला मिळतो ? तर तो त्या दिवसाचा मिळतो.त्याने ती मराठी सिरीयल केली म्हणून मिळतो.पण जेव्हा ती मालिका हिंदीमध्ये डब केली जाते, त्यातून आलेला पैसा हा वाहिनीकडे जातो. मग त्या कलाकाराला काय मिळतं?ज्या लेखकाने ही मालिका लिहिली, ज्या निर्मात्याने मालिका उभारली त्याला काय मिळतं? या सगळ्यांना काहीही मिळत नाही यामध्ये. सगळ्या चॅनलचे आता डिजिटल प्लॅटफॉर्म तयार आहेत. या डिजिटल प्लॅटफॉर्मशी जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते मालिकेच्या बजेटच्या हिशोबाने होतं.’
‘..मग ही पिळवणूक नाही का?’ अमोल कोल्हे यांचा सवाल
‘जेव्हा एखादी मालिका स्टार प्रवाहवर सुरू असते, तेव्हा ती हॉटस्टार वर सकाळी सहा वाजता पडलेली असते. DP, निर्माते, कलाकारांच्या डोक्यावर टांगती तलवार असते की संध्याकाळी प्रसारित होणाऱ्या तुमच्या मालिकेचा टीआरपी दाखवा. अरे मग, सकाळी 6:00 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत जे लोक डिजिटल प्लॅटफॉर्मवर मालिका पाहिली,त्याचं तुम्ही काय करणार आहात?किंवा त्यातून जो पैसा तयार होतोय. तिथे जे वैचारिक आणि ऐतिहासिक मूल्य तयार होतंय. त्याचा जर तुम्ही काहीच मोबदला देणार नसाल, तर ही पिळवणूक नाही का? असा सवाल डॉ अमोल कोल्हे यांनी केला. काही दिवसांपूर्वी वाहिनीने दिलेलं टीआरपीचं कारण अर्धसत्य असल्याचेही ते म्हणाले होते.
त्यांनी पुढे हेही सांगितलं ‘ सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका आता जेव्हा इतर भाषांमध्ये डब होईल, त्यावेळी त्यातून निर्माण होणाऱ्या रेवेन्यूचा एक भाग मालिकेतील तंत्रज्ञ, कलाकार, निर्माते,लेखक या सगळ्यांना जाईल.हे मी आत्ताच जाहीर करतो.म्हणजे जर मी एखाद्या गोष्टीवर आक्षेप घेतोय,तर त्या गोष्टीची सुरुवात मी माझ्यापासून करतोय. ही मालिका मराठी, हिंदी, इंग्रजी, बंगाली,गुजराती या भाषांमध्ये डब होणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष