मोठी बातमी! ओमराजे निंबाळकर यांनी थेट शिवसेनेच्या पक्ष चिन्हाबाबत केले मोठे विधान, मशाल चिन्हावर उभ्या.. – Marathi News | MP Omraje Nimbalkar made significant statement regarding the Shiv Sena Thackeray faction party symbol


ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे खिंडार पडले. तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी केली. मोठ्या घडामोडी घडत आहेत. ही बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून अनेक प्रयत्न केली जात आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी मध्यरात्री भेट घेतली. आज पुण्याहून धाराशिवला ओमराजे निंबाळकर गेले. तिथे ते बैठक घेतील, त्यानंतर आपला निर्णय सांगतील. पक्षांतराच्या मुद्द्यात ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भावना अगोदरच बोलून दाखवल्या. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून कशाप्रकारे आपल्याला वाईट ठरवले जात आहे आणि इतका वाईट आपण 3 दिवसात कसा झालो? यावरही बोलताना ते नुकताच दिसले. ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, मी जर इतका वाईट असतो, तर मला लोकांनी निवडून दिले नसते. 20 वर्षापूर्वी माझ्या वडिलांची हत्या झाली, त्यावेळी आमच्यावर जो दु:खाचा डोंगर कोसळला होता, तेच दु:ख आम्हाला कालही झाले. ज्यावेळी वडिलांची हत्या झाली, तो दिवस शनिवारचाच होता आणि कालही शनिवारच होता.

ओमराजे निंबाळकर यांनी पुढे म्हटले की, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या. माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रात नगरपालिका आणि पंचायत समितीत माझी साधी एकही जागा निवडून आली नाही. एवढे आम्ही वाईट आहोत का? 24 तास आम्ही लोकांना देतो. मशाल चिन्हावर उभ्या असलेल्या आमच्या कार्यकर्त्याला पराभूत का व्हावे लागले, असाही प्रश्न ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला.

हेच नाही तर माझा एक कार्यकर्ता तिसऱ्या क्रमांकावर होता. महत्वाचे म्हणजे मेहनत घेणारा कार्यकर्ता होता. कार्यकर्त्याची हेटाळणी का केली जाते?  गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा कार्यकर्ता उभा केला नाही. आमच्या लोकांना पराभवाचे तोंड पाहावं लागलं. ही वस्तुस्थिती होईल, असेही ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले.

ओमराजे निंबाळकर आपल्या कार्यकर्त्यांसोबत बोलून निर्णय घेणार आहेत. मात्र, ते आपल्या मनातील खदखद बोलून दाखवत आहेत. काही वेळातच ओमराजे निंबाळकर निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेतेही ओमराजे निंबाळकर यांच्या संपर्कात आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *