Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक राशींचे भाग्योदयाचे संकेत; जूनच्या शेवटच्या आठवड्यात आयुष्यात मोठा ट्विस्ट, साप्ताहिक राशीभविष्य वाचा


Weekly Horoscope 22 To 28 June 2026: ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्याचा (June 2026) शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा 12 राशींसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. हा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ रास साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) – प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. गैरसमज दूर होऊन नात्यातील विश्वास अधिक दृढ होईल. अविवाहितांना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विवाहितांनी एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यास घरातील वातावरण आनंदी राहील.

करिअर (Career) – नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. काहींना पदोन्नती किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक संकेत मिळू शकतात. व्यवसायिकांनी नवीन भागीदारी करताना कागदपत्रांची तपासणी करावी. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी चांगली व्यावसायिक संधी मिळू शकते.. 

आर्थिक स्थिती (Wealth) – तूळ राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढू शकेल. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे.

आरोग्य (Health) – आरोग्य सामान्यतः चांगले राहील. मात्र कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम याकडे लक्ष द्या. मानसिक शांततेसाठी योग-ध्यानाचा लाभ होईल.

वृश्चिक रास साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) – वृश्चिक राशीच्या लोकांनी प्रेमजीवनात भावना अधिक तीव्र राहतील. जोडीदारासोबत संवाद वाढवण्याची गरज आहे. राग किंवा संशयामुळे वाद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवा. विवाहितांसाठी आठवड्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल राहील. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल.

करिअर (Career) – करिअरच्या बाबतीत कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. नवीन प्रकल्प किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायिकांना नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. मात्र कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका.

आर्थिक स्थिती (Wealth) – धनलाभाचे संकेत आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. शेअर बाजार किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. आठवड्याच्या शेवटी एखादा अनपेक्षित खर्च होऊ शकतो.

आरोग्य (Health) – आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पचनसंस्था, अॅसिडिटी किंवा रक्तदाबाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. तळलेले आणि जड पदार्थ टाळा. नियमित चालणे आणि पुरेसे पाणी पिणे फायदेशीर ठरेल.

हेही वाचा

Baba Vanga: कठीण काळ संपला, 2026 च्या शेवटी तूळ, मकरसह 4 राशींचे कोट्यधीश होण्याचे योग! बाबा वेंगाची ‘ही’ भविष्यवाणी कमी लोकांना माहीत, तुमची रास?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *