Netflix Trending Movie: नेटफ्लिक्सवर 275 कोटी कमावलेल्या ‘या’ चित्रपटाचा एकच धुमाकूळ; थिएटरनंतर OTT वरही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला सिनेमा!


Netflix Trending Movie: ओटीटी प्लॅटफॉर्मवर दररोज नवनवीन चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होत असतात. मात्र त्यापैकी काहीच प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करतात. सध्या हॉरर, ॲडव्हेंचर आणि ॲक्शन या प्रकारांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसत आहे. ‘स्त्री 2’नंतर हॉरर-कॉमेडी या प्रकारालाही मोठी लोकप्रियता मिळाली होती. अनेक दिग्दर्शकांनी या प्रकारात नवे प्रयोग करण्यास सुरुवात केली.आज आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्या सिनेमाने जगभरात जवळपास 270 कोटी रुपयांची कमाई केलीय. आपल्या बजेटच्या तुलनेत या चित्रपटाने तब्बल 66 टक्के अधिक कमाई करत सुपरहिट चित्रपट होण्याचा किताब मिळवला.

किती झाली चित्रपटाची कमाई?

आपण बोलत आहोत भूत बंगला या चित्रपटाबद्दल. अक्षय कुमार आणि तब्बू यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट गेल्या आठवड्यात 12 जून रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला. या सिनेमातून प्रियदर्शन आणि अक्षय कुमार ही जोडी तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आली असून, या जोडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रिलीजच्या अनेक आठवड्यानंतरही हा चित्रपट ओटीटीवर Netflix वर नंबर 1 ट्रेंडिंगमध्ये कायम आहे.या चित्रपटात अक्षय कुमारसोबत तब्बू, वामिका गब्बी, परेश रावल आणि राजपाल यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

काय आहे चित्रपटाची कथा?

चित्रपटाची कथा 350 वर्षे जुन्या एका हवेलीभोवती फिरते. ही हवेली अक्षय कुमारच्या वारशातून मिळालेली असते आणि ती मंगलपूर गावात आहे. मात्र त्या गावावर ‘वधूसुर’ नावाच्या राक्षसाची दहशत असल्यामुळे तिथे कोणीही लग्न करण्यास धजावत नाही.चित्रपटात अक्षय कुमार लंडनमध्ये राहत असतो आणि मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असतो. त्याला मंगलपूरमध्ये त्याच्या वारसाने मिळणाऱ्या हवेलीबद्दल माहिती मिळते. त्यानंतर तो त्या हवेलीवर ताबा मिळवण्याचा आणि आपल्या बहिणीचे डेस्टिनेशन वेडिंग तिथेच करण्याचा प्लॅन आखतो. पण त्यानंतर या भुताटकी हवेलीचे एकामागोमाग एक गूढ रहस्य उलगडत जातात.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *