India-A vs Sri Lanka-A Final Tri Nation A Series Live Streaming : भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील तिंरगा मालिकेचा (Tri-Nation Series) अंतिम सामना 21 जून खेळवला जाणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात दोन्ही संघ विजेतेपदासाठी आमनेसामने येतील. याआधी जेव्हा दोन्ही संघ लीग स्टेजमध्ये भिडले होते, तेव्हा भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला होता. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात मैदानावर कमालीची चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ट्रॉफीवर नाव कोरायचे असेल, तर आज कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. या सामन्यात सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशीवर असेल. आयपीएल 2026 मध्ये तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या वैभवला या मालिकेत अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. अशा स्थितीत अंतिम सामन्यात बॅटने चोख उत्तर देण्याची सुवर्णसंधी त्याच्याकडे असेल.
लीग स्टेजमध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली?
यजमान श्रीलंका अ संघाने लीग स्टेजमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यांनी 4 पैकी 3 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे, भारत अ संघाने 4 पैकी 2 सामन्यात विजय मिळवत दुसरे स्थान मिळवले. अफगाणिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिल्याने त्याचे फायनलचे तिकीट हुकले.
भारत अ विरुद्ध श्रीलंका अ सामना कधी आणि कुठे होणार?
भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील तिंरगा मालिकेचा अंतिम सामना 21 जून रोजी रविवार खेळला जाणार आहे. जो रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दांबुला येथे होईल. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 10:00 वाजता सुरू होईल, तर टॉस रात्री 9:30 वाजता होईल.
थेट प्रक्षेपण (Live Streaming) कुठे आणि कसे पाहायचे?
तिंरगा मालिकेच्या प्रक्षेपणाचे हक्क सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (Sony Sports Network) कडे आहेत. तुम्ही सोनी स्पोर्ट्सच्या विविध चॅनेल्सवर हिंदी, इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये या सामन्याचा आनंद घेऊ शकता. जर तुम्हाला हा सामना मोबाईल किंवा लॅपटॉपवर पाहायचा असेल, तर सोनी लिव्ह (Sony LIV) ॲप आणि वेबसाइटवर सामन्याचे Live Streaming उपलब्ध असेल.
तसेच या सामन्याशी संबंधित सर्व लाईव्ह अपडेट्स, बातम्या आणि रेकॉर्ड्स तुम्ही https://marathi.abplive.com/sports च्या अधिकृत संकेतस्थळावर वाचू शकता. आयर्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी टीम इंडिया हा किताब जिंकून इतिहास रचणार का, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला