Shani Vakri 2026 : 27 जुलैपासून बदलणार शनिच्या ढैय्या आणि साडेसातीची चाल; मेष, कुंभ, मीन राशींवर शनिदेवाची कृपा राहील की कठीण परीक्षेचा काळ सुरुच?


Shani Vakri 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनिला (Shani Dev) ग्रहांचा कर्मफळदाता आणि न्यायदेवता म्हणतात. जेव्हा शनि आपल्या चालीत परिवर्तन करतात. तेव्हा त्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर तर होतोच पण करिअर, आर्थिक स्थितीवरही होतो. 27 जुलै 2026 रोजी शनिदेव वक्री होणार आहे. शनिची ही उलटी चाल अनेकांसाठी त्यांच्या कर्मानुसार घडणारी असमार आहे. 

सध्या मेष, कुंभ आणि मीन राशींच्या लोकांवर शनिची साडेसाती सुरु आहे. तर, धनु आणि सिंह राशींवर शनिची ढैय्या सुरु आहे. त्यामुळे शनिच्या वक्री चालीचा परिणाम या राशींवर कसा होणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाटी शनिची वक्री चाल मिश्रित फलदायी स्वरुपाची असणार आहे. या काळात तुमच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. तसेच, आर्थिक बाबतीत निर्णय घेताना नीट विचारपूर्वक निर्णय घ्या. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येणारा असणार आहे. या कालावधीत तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, अनेक नवीन जबाबदाऱ्या देखील तुमच्यावर येऊ शकतात. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांवर शनिच्या ढैय्याचा प्रभाव सुरु आहे. शनिच्या वक्री चालीमुळे कामाच्या ठिकाणी तसेच तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी वाढू शकतात. तुम्हाला काही संकटांचा सामना करावा लागू शकतो. या कालावधीत एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना घाईगडबड करु नका. कोणताही विचार करताना नीट विचारपूर्वक करा. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी शनिची वक्री चाल आर्थिकदृष्ट्या सावधानता बाळगणारी असणार आहे. या काळात शनिच्या ढैय्याचा प्रभाव असल्या कारणाने तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करु नये. पैशांचा व्यवहार करु नका. आर्थिक बाबतीत घेतलेले निर्णय फसू शकतात. त्यामुळे धैर्याने काम करा. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे, असात शनिची वक्री चाल तुमच्यावर सकारात्मक परिणाम घेऊन येऊ शकते. या काळात तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. करिअरमध्ये प्रगतीचे चिन्ह आहेत. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा : 

Adhik Maas: अधिक मास संपताच फक्त 12 दिवसचं लग्नाचे मुहूर्त? पुन्हा शुभ कार्य निषिद्ध? जून-जुलै विवाह मुहूर्त जाणून घ्याच…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *