EVM मधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताचं भाजपनं मशिन्स जाळल्या, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप


Nana Patole : ना रहेगा बास ना बजेगी बासरी याच म्हणीचा वापर करत भाजप आणि मोदी सरकार देशात कारभार करत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी केली. पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेवर आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ईव्हीएममधील गडबड सुप्रीम कोर्टात पोहोचताच भाजपनं मशिन्स जाळल्याचा खळबळजनक आरोप नाना पटोले यांनी केला आहे. भाजप सरकारने पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटल्याचे पटोले म्हणाले. 

 ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार आणि गडबड करण्यात आल्याचा आरोप 

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगापासून ते संपूर्ण निवडणूक मॅनेजमेंट आणि ‘मॅच फिक्सिंग’ हे भाजपच्या बाजूनं करण्याचा प्रयत्न झाला. हे चित्र संपूर्ण देश आणि पश्चिम बंगालची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत होती. हे संपूर्ण प्रकरण आता सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार आणि गडबड करण्यात आल्याचा आरोप पटोले यांनी केला. ही बाब आता लोकांसमोर उघड होत आहे, हे समजताच पश्चिम बंगालमधील पराभवाच्या छायेखाली असलेल्या भाजप सरकारनं ईव्हीएम मशिन्सच जाळून टाकल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा घातपात मुद्दाम घडवून आणला गेल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

 रोहित पवारांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

भाजपच्या 2014 ते 2019 या काळातील फडणवीस सरकारनं 2016 मध्ये जाहीर केलेली कर्जमाफी ही निव्वळ फसवणूक होती, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. सरकार बदलले तरी अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण झालेली नाही, असे सांगत त्यांनी सध्याच्या सरकारच्या धोरणांवरही कडाडून टीका केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन रोहित पवार यांचं पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली. शेतकऱ्यांकडून जबरदस्तीनं आधी एवढे पैसे भरा, मगच तुमची कर्जमाफी होईल अशा अटी घातल्या जात आहेत. यामुळे प्रत्यक्ष कर्जमाफ होण्याऐवजी शेतकऱ्यांच्या खिशातूनच पैसे काढून घेतले जात आहेत. ही अत्यंत क्लेशदायक बाब असून प्रत्यक्षात बँकांचे कर्ज माफ होताना कुठेही दिसत नसल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे गेल्या तीन दिवसांपासून पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्ती शिवाय सरकारनं कर्जमाफी करावी, या मागणीसाठी आहे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *