मुंबई : ठाकरे गटातील खासदार फुटण्याच्या चर्चांदरम्यान आज (रविवारी, ता १४) मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाच्या लोकसभेच्या खासदारांची (Shivsena UBT Meeting) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचे सर्व नऊ खासदार सहभागी झाल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. यावेळी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी खासदारांना मार्गदर्शन केले असून पुढील महिन्यात पुन्हा अशाच प्रकारची बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तर उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन ऑफलाईन बैठकीत नेमके कोणते मुद्दे मांडले ते समोर आले आहेत.(Shivsena UBT Meeting)
Shivsena UBT Meeting : उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन ऑफलाईन बैठकीत नेमके कोणते मुद्दे मांडले
१. कर्जमाफी विरोधात आवाज उठवा… कर्जमाफी संदर्भात सरकारला प्रश्न विचारा..
2. सर्व खासदार आपल्या सोबत आहेत तुम्ही कोणाच्याही संपर्कात नाहीत… कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे तो संभ्रम काही ठिकाणी दूर करा
3. महागाई कर्जमाफी शेतकऱ्यांचे प्रश्न यावर आवाज उठवा…
4. जशी खासदारांची बैठक घेतली तशी आज जिल्हाप्रमुखांची सुद्धा झूम मीटिंग उद्धव ठाकरे घेणार आहेत
5. जिल्ह्या जिल्ह्यातील प्रश्न त्या ठिकाणची समस्या जिल्हाप्रमुखांकडून उद्धव ठाकरे जाणून घेतील
6. संघटनात्मक दृष्टिकोनातून सुद्धा उद्धव ठाकरेंनी आजच्या खासदारांच्या बैठकीत मार्गदर्शन केलं
7. ज्या ठिकाणी खासदारांच्या संदर्भात संभ्रम आहे त्या ठिकाणी तो संभ्रम दूर करून आपण पक्षासोबत आहोत हे कार्यकर्त्यांना सांगा आपली भूमिका स्पष्ट करा असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी बैठकीत सांगितलं
Shivsena UBT Meeting : ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत 9 पैकी किती खासदार उपस्थित?
प्रत्यक्ष उपस्थित खासदार
1) संजय दिना पाटील
२) अरविंद सावंत
३) राजाभाऊ वाजे
४) अनिल देसाई
ऑनलाईन उपस्थित खासदार
१) ओमराजे निंबाळकर
२) भाऊसाहेब वाघचौरे
३) संजय देशमुख
४) संजय जाधव
५) नागेश पाटील आष्टीकर
Shivsena UBT Meeting : संजय राऊतांनी पोस्ट करत बैठकीबाबत दिली माहिती
संजय राऊतांनी पोस्ट करत मातोश्रवरील बैठकीबाबत माहिती देताना म्हटलं की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’वर लोकसभेतील सर्व खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली बैठकीत अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाझे हे उपस्थित होते. शिवाय ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश आष्टीकर, संजय देशमुख हे खासदार व्हर्चुअली उपस्थित होते. तर संजय बंडू जाधव (परभणी) यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी फोनवर चर्चा केली, सर्व खासदार एकजूट आणि निष्ठेने शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे आहेत, बैठकीत श्री.आदित्य ठाकरे उपस्थित होते आता तरी अफवांचा बाजार बंद होईल ही अपेक्षा! जय महाराष्ट्र !, अशी पोस्ट करून सर्व आमदार उपस्थित असल्याची माहिती राऊतांनी दिली आहे.
ऑनलाइन उपस्थित राहिलेल्या खासदारांच्या अनुपस्थितीमागील कारणांबाबतही राऊत यांनी माहिती दिली. ओमराजे निंबाळकर यांचे पुत्र पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत असल्याने ते तेथून बैठकीत सहभागी झाले. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नींची प्रकृती बिघडल्याने ते शिर्डीहून ऑनलाइन जोडले गेले. तर काही खासदार स्थानिक राजकीय आणि कौटुंबिक कारणांमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान, आज प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहू न शकलेले खासदार येत्या दोन ते तीन दिवसांत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र भेट घेणार असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
Shivsena UBT Meeting : ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर राऊतांचे प्रत्युत्तर
अलीकडे ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा आणि कथित ‘ऑपरेशन टायगर’बाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी या चर्चांना फेटाळून लावले. “आमचे संपूर्ण संसदीय दल एकजूट आहे. आम्ही घाबरणारे नाही. ऑपरेशन टायगरच्या चर्चा करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, आम्हीच ऑपरेशन करणार आहोत. ऑपरेशन टायगर नाही, तर ऑपरेशन लांडगा करू,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर पलटवार केला.
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप