8th Pay Commission: कर्मचाऱ्यांना मोठी गुडन्यूज! महागाईदरम्यान 8 व्या वेतन आयोगापूर्वीच DA Hike, अपडेट वाचली का? – Marathi News | 8th Pay Commission Great news for employees DA hike even before the 8th Pay Commission have you read the update


8 वेतन आयोग महागाई भत्ताImage Credit source: एजन्सी

8th Pay Commission DA Hike: 8 व्या वेतन आयोगाविषयी गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सध्या केंद्र सरकारचे कर्मचारी आयोगाच्या शिफारशीविषयी प्रतिक्षा करत आहेत. तर या दरम्यान महागाई भत्त्याविषयी एक अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्त्याविषयी नवीन अपडेट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या नवीन  वेतन आयोगाचे  सदस्य हे देशभरातील विविध विभागाच्या कर्मचारी संघटनांशी चर्चा करत आहेत. त्यांच्या मागण्या जाणून घेत आहेत. त्यानंतर आयोग शिफारशी जाहीर करेल.

कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता

केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना आता 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची प्रतिक्षा आहे. त्यापूर्वीच केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईत दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात (DA) वाढीचा फायदा मिळू शकतो. ताज्या आकडेवारीनुसार, जुलै 2026 पासून DA मध्ये 3% टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. या ताज्या अपडेटमुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजूरीची प्रतिक्षा

कामगार मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, औद्योगिक कामगारांसाठी महागाई निर्देशांक (AICPI-IW) मार्च 2026 मध्ये 149.1 वाढून एप्रिल 2026 मध्ये 149.9 इतका झाला आहे. त्या आधारे असा अंदाज बांधण्यात येत आहे की, सध्याचा 60% महागाई भत्ता वाढून 63% होऊ शकतो. याविषयीचा अंतिम निर्णय हा मे आणि जून 2026 मधील आकडे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजूरीनंतर होईल.

फिटमेंट फॅक्टरवर कर्मचारी संघटनांचा जोर

फिटमेंट फॅक्टरवरून (Fitment Factor) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती वाढ होईल यांचे गणित ठरते. मूळ वेतन वाढीसाठी हा सर्वात मोठा फॅक्टर मानला जातो. 7 व्या वेतन आयोगात 2.57 हा फिटमेंट फॅक्टर होता. तज्ज्ञानुसार, महागाई आणि आर्थिक परिस्थिती पाहता वेतन आयोगात 2.15 असे गुणोत्तर फिटमेंट फॅक्टर असू शकते. तर देशातील विविध कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 3.83 करण्याची मागणी लावून धरली आहे.

8 व्या वेतन आयोगासमोर काय मागणी?

8 व्या वेतन आयोगाचे सदस्य हे विविध कर्मचारी संघटनांशी चर्चा करत आहेत. त्यांचे म्हणणे जाणून घेत आहेत. त्यात कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत. या मागण्यांवर विचार केल्यानंतर वेतन आयोगाच्या शिफारसी समोर येतील. त्याची कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा आहे. कर्मचाऱ्यांना आयोगाकडे या मागण्या केल्या आहेत.

फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करावी

किमान वेतनात मोठी वाढ करावी

किमान वेतन ठरवण्याचा फॉर्म्युला बदलावा

महागाई भत्त्यात वाढ करण्यात यावी

निवृत्ती वेतनाविषयी मोठा निर्णय घेण्यात यावा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *