Pankaj Bhoyar : प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ होण्याच्या शक्यता; गृह विभागाकडून यापूर्वीच्या सर्व व्हिडीओंची चौकशी होणार, पंकज भोयर यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले…


Pankaj Bhoyar On Pranit More Stand Up Comedian Row: प्रणित मोरेच्या (Pranit More) शोमधले ‘370 रुपयांची बिर्याणी’ (370 Rupees Biryani) आणि डॉक्टर सेजल पवार या तरुणीचं मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सबाबतचं अश्लील वक्तव्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरलं झालं आणि देशभरात मोठा गदारोळ झाला असून देशात संतापाची लाट उसळली आहे. अशातच  डॉ. सेजल पवारने(Doctor Sejal Pawar)  KEM रुग्णालय प्रशासनाकडे लेखी माफीनामा सादर केला. याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या समितीने संबंधित कॉमेडी शोचं संपूर्ण रेकॉर्डिंग पाहून विद्यार्थिनीशी सविस्तर चर्चा केली असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे प्रणित मोरेने (Comedian Pranit More) देखील सोशल मीडियातून माफी मागितली आहे. माझी ती सर्वात मोठी चूक होती. मला माफ करा आणि पुन्हा एक संधी द्या, मी नक्कीच चांगला व्यक्ती बनून दाखवेन असं तो म्हणाला आहे.

असं असताना आता कॅामेडीयन प्रणित मोरे (Pranit More) याच्या अडचणी वाढणार असून गृह विभागाकडून प्रणित मोरे याच्या यापूर्वीच्या सर्व व्हिडिओची चौकशी होणार. यापूर्वी अपलोड केलेले व्हिडिओ कंटेन्टची सायबर पोलीसांकडून सखोल चौकशी सुरु आहे. अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे.

Pankaj Bhoyar On Pranit More : ‘प्रेक्षक वाढवण्याच्या नादात वादग्रस्त कंटेट, नक्कीच कारवाई होणार

‘विनोद न करता विकृती करत असाल, तर थेट कारवाई होईल’ असा सज्जड दम गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. ३७० ची बिर्याणीची वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि डॅा. तेजस पवारवर कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले.’प्रेक्षक वाढवण्याच्या नादात वादग्रस्त कंटेट अपलोड केला तर यापुढे कारवाई होणार. असेही पंकज भोयर म्हणाले.

केईएम रुग्णालयाकडून डॉक्टर तरुणीच्या वक्तव्याप्रकरणी चौकशीचे आदेश (KEM Hospital Inquiry Statement Made By Sejal Pawar)

डॉक्टर सेजल पवारनं आपल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी माफी मागितली असली तर हे प्रकरण त्यांना भोवणार असंच दिसतंय. केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनानं सेजल यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिलेत. त्यासाठी रुग्णालय आणि महाविद्यालय प्रशासनाकडून दोन सदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आलीय. संबंधित व्हिडीओ तसंच त्यातील कथित वक्तव्यांची या समितीकडून पडताळणी केली जातेय. शक्य तितक्या लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना चौकशी समितीला देण्यात आल्यात. 

नेमका काय आहे 370 रुपयांच्या बिर्याणीचा वाद? (Pranit More Stand Up Comedian Row)

हा वाद प्रणित मोरेच्या शोमधील एका व्हायरल व्हिडीओमुळे सुरू झाला. या व्हिडीओमध्ये हिमांशू जांगडा नावाच्या तरुणाने एका महिलेला डेटवर गेल्याचा अनुभव सांगितला होता.  ‘चिकन बिर्याणीवर 370 रुपये खर्च केले आता वसूल तर करावे लागतील ना..’ असं म्हणत त्याने त्या खर्चाच्या बदल्यात तरुणीकडून  शारीरिक जवळीक अपेक्षित असल्याचे सूचित करणारे वक्तव्य केले. या विधानानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. अनेकांनी या वक्तव्याला महिलांविरोधी, अपमानास्पद आणि संमतीच्या संकल्पनेला धक्का देणारे म्हटले. वाद केवळ हिमांशूपुरता मर्यादित राहिला नाही. शोदरम्यान त्या वक्तव्याला विरोध न केल्यामुळे आणि संबंधित क्लिप सोशल मीडियावर शेअर केल्याच्या आरोपांमुळे प्रणित मोरेलाही मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले. अशा आक्षेपार्ह वक्तव्यांना ‘कॉमेडी’च्या नावाखाली थारा देऊ नये, असंही म्हटलं. सोशल मीडियावर होणाऱ्या या सगळ्या प्रकारामुळे प्रणित मोरेला माफी मागावी लागली. हा वाद तरीही इतका वाढला की त्याने थेट instagram अकाऊंटच बंद करून टाकलं. 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *