Adhik Maas 2026 : अधिक मासामध्ये जावयाचीच पूजा का करतात? जावयालाच वाण देण्यामागचं कारण नेमकं काय? वाचा यामागचं महत्त्व


Adhik Maas 2026 : हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात अधिक मासाला (Adhik Maas) मोठे महत्त्व आहे. 2026 वर्षात अधिक मास 17 मे रोजी सुरू झाला आहे. धार्मिक आणि ज्योतिष शास्त्रानुसार पाहायला गेलं तर, विश्वाचे रक्षक भगवान विष्णूला समर्पित हा महिना आहे. अधिक मासाला ‘मलमास’ म्हटलं गेल्यामुळे तो त्याज्य होता. आणि नंतर भगवान विष्णूंनी त्याचा अंगिकार केला म्हणून ‘पुरुषोत्तम मास’ याला म्हटलं जाऊ लागलं. यामध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते. याच संदर्भात अधिक माहिती आपण संदर्भाने जाणून घेऊयात. 

‘पुरुषोत्तम मास’ का म्हणतात?

असे मानले जाते की, अधिक मासाला कोणताही स्वामी नव्हता, त्यामुळे तो उपेक्षित ठरला. तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला आपले ‘पुरुषोत्तम’ नाव दिले आणि या महिन्याचे स्वामीत्व स्वीकारले. म्हणूनच या काळात विष्णूची उपासना अत्यंत फलदायी मानली जाते.

यामध्ये आपला अवतीभोवती असलेले भगवान विष्णूंचे प्रत्यक्ष रुप कोण आहेत. तर, ज्यावेळेला आपण आपल्या मुलीचा विवाह करतो. विवाह करताना कन्यादान असा विधी आपण करतो. या कन्यादानामध्ये आपण असा संकल्प करत असतो की, विष्णू स्वरुपिन वराय, श्री रुपिणी इमाम कन्या… याचाच अर्थ असा होतो की, माझी मुलगी ही लक्ष्मी स्वरुप आहे. ती विष्णूस्वरुप असणाऱ्या या माझ्या जावयाला मी देतोय. अर्था आपला जावई हा प्रत्यक्ष विष्णूस्वरुप आपल्यासाठी असतो. आणि म्हणून त्यांची पूजा केल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची पूजा केल्याचं पुण्य प्रत्यक्ष मिळत असतं. अशा वेळी 33 अशा गोष्टी, पदार्थ ज्याला छिद्र आहेत. उदा..अनारसे, बत्तासे इ. अशा सछिद्र असलेल्या अशा 33 गोष्टींचं दान आपल्याला जावयाला या अधिक महिन्यात द्यायचं असतं.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :                                         

Horoscope Today 29 May 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 7 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, वाचा आजचे राशीभविष्य

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *