Sourav Ganguly On Vaibhav Sooryavanshi Test Future;’तर खूपच घाईल होईल’, वैभव सूर्यवंशीच्या डेब्यूवर सौरव गांगुली यांनी केलेले विधान चर्चेत


Sourav Ganguly On Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये क्वालिफायर 2 सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी आता राजस्थानचा खेळाडू वैभव सूर्यवंशीबद्दल माजी दिग्गज खेळाडू सौरव गांगुली यांनी एक विधान केले आहे.

sourav ganguly on vaibhav sooryavanshi
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: काल आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात क्वालिफायर 1 सामना रंगला. आज दुसरा क्वालिफायर सामना रंगणार आहे. दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स आणि आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये रंगला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीकडे विशेष लक्ष असणार आहे. या सामन्यापूर्वी दिग्गज खेळाडू सौरव गांगुलीने आता वैभवबद्दल एक विधान केले ज्याची जोरदार चर्चा होत आहे.

‘वंडर बॉय’ म्हणून ओळखला जाणारा 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या 2026 आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने लीग टप्प्यात 500 हून अधिक धावा केल्या आहेत. आयपीएलमधील वैभवची स्फोटक फलंदाजी पाहून, क्रिकेट तज्ज्ञ आता त्याला भारतीय संघात स्थान देण्याची शिफारस करत आहेत. अनेक तज्ज्ञांच्या मते, वैभवला शक्य तितक्या लवकर टी-20 संघात समाविष्ट केले पाहिजे.

Maharashtra TimesRCB vs GT Qualifier 1: ‘तो’ मैदानात आला अन् आरसीबीने सामना जिंकला; मॅचनंतर विराटही ‘लकी चार्म’ला भेटायला गेला
याच संदर्भात, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही वैभव सूर्यवंशीच्या भविष्याबद्दल आणि त्याला आत्ता भारतीय संघात घ्यावे की नाही यावर आपले मत व्यक्त केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीने यावर आपले मत मांडले आहे.

सौरव गांगुली वैभव सूर्यवंशीबद्दल काय म्हणाला?

भारतीय संघात वैभव सूर्यवंशीच्या निवडीबद्दल विचारले असता, गांगुली म्हणाले, “वैभवचा समावेश ताबडतोब टी-20 क्रिकेटमध्ये व्हायला हवा, पण सध्या कसोटी क्रिकेटमध्ये नाही. कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये अजून धावा करण्याची गरज आहे. पण सध्या तो खरोखरच प्रतिभावान आहे. जगातील कोणत्याही गोलंदाजाविरुद्ध 15 वर्षांच्या मुलाला अशाप्रकारे फलंदाजी करताना पाहणे आश्चर्यकारक आहे. तो भारताचे भविष्य आहे.”

सौरव गांगुली आकिब नबीबद्दल काय म्हणाले?

अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी संघातून आकिबला वगळण्यात आले असले तरी, गांगुलीने त्याला पाठिंबा दर्शवला. नबीबद्दल गांगुली म्हणाले, “त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली, पण प्रिन्स यादव देखील प्रतिभावान आहे आणि त्याच्याकडे चांगला वेग आहे. मला वाटते की निवड समितीने प्रिन्सला संधी देऊन खूप चांगले काम केले आहे, कारण जेव्हा तुमच्याकडे उत्तम वेग असतो, तेव्हा तुम्ही त्याला फक्त प्रथम-श्रेणी क्रिकेटपुरते मर्यादित ठेवत नाही. माझा विश्वास आहे की त्या दोघांचीही निवड व्हायला हवी होती.”

राजस्थान आणि हैदराबाद यांच्यातील क्वालिफायर 2 सामना हा न्यू चंदीगढमध्ये रंगणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो गुजरातशी सामना खेळेल. आरसीबीने आधीच फायनलचे तिकीट पक्के केले आहे.

सलोनी पाटील

लेखकाबद्दलसलोनी पाटीलसलोनी पाटील या सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. गेल्या ३ वर्षांपासून पत्रकारिता आणि डिजिटल मीडियामध्ये सक्रिय आहे.
सलोनी गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करत आहेत आणि क्रीडा व बिझनेस क्षेत्रातील चालू घडामोडींवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे
सलोनी यांनी सामना, एबीपी माझा या ठिकाणी इंटर्नशीप केली आहे. ‘आम्ही पार्लेकर’ वृत्तपत्रात कॉ-ऑर्डिनेटर म्हणून काम करण्याचा अनुभव आहे.
हेमा मालिनी संपादक असलेल्या ‘मेरी सहेली’ येथे सोशल मीडिया आणि व्हिडिओ एडिटर म्हणून काम. करण्याचा अनुभव आहे. ‘न्यूज १८ लोकमत’मध्ये रिपोर्टर म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. सलोनी यांनी साठ्ये कॉलेजमधून BMM चे शिक्षण आणि त्यानंतर कम्युनिकेशन अँड जर्नलिज्ममध्ये मास्टर्स पदवी घेतली आहे.
आणखी वाचा