Aamir Khan Nephew Imran Khan Joins Student Protest: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची (Student Protest) झळ सध्या संपूर्ण देशभरात पोहोचली आहे. दिल्लीमध्ये (Delhi) सुरू असलेल्या जंतर-मंतरवरच्या आंदोलनाचे (Jantar Mantar Protest) पडसाद देशातील जवळपास सर्वच शहरांत पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमधील (Bollywood News) कलाकारही ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (Cockroach Janata Party) वतीनं विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा दर्शवत आहेत. अलिकडेच, दंगल फेम अभिनेत्री आयेशा खान (Actress Ayesha Khan) मुंबईत (Mumbai News) शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी तिला मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) ताब्यात घेण्यात आलेलं. काही वेळानं तिची सुटकाही करण्यात आली, पण तिनं सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ तुफान व्हायर झाला. अशातच बॉलिवूडचे दिग्गज सेलिब्रिटी विद्यार्थ्यांसाठी मैदानात उतरले असताना, बॉलिवूडचे तिन्ही खान्स मात्र मौन बाळगून होते. अशातच बुधवारी रात्री उशिरा सलमान खाननं (Salman Khan) ट्वीट करुन विद्यार्थ्यांना आपला पाठींबा दिला. पण, इथे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या चिंतेनं अख्खा देश पेटलेला असतानाच मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीर खानचा (Aamir Khan) पत्ताच नाही. पण, त्याचा भाचा अभिनेता इमरान खान (Imran Khan) मात्र विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.
आमिर खानचा भाचा इमरान खान याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये इमरान खान विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होताना दिसतोय. त्याला मुंबईतील शिवाजी पार्क इथे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना, त्यात अचानक इमरान खान दिसला. नेटकऱ्यांकडून इमरान खानवर कौतुकाचा वर्षाव होतोय. तर, आमीर खाननं भाच्याकडून काहीतरी शिकावं, अशा कमेंट्सही नेटकऱ्यांकडून केल्या जात आहेत.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला इमरान खानचा पाठिंबा (Imran Khan Supports Student Protest)
व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेता इमरान खान काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेला आणि खांद्याला बॅग लावलेला दिसतोय. त्याला पाहताच विद्यार्थी त्याचे व्हिडीओ काढू लागले आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त करू लागले. इमरान आंदोलनातील विद्यार्थ्यांना सेल्फीसुद्धा देतोय.
विद्यार्थ्यांना पाठींबा देण्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी सेलिब्रिटी मैदानात (Celebrity Supports Student Protest)
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणी सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) गेल्या 25 दिवसांपासून उपोषणावर आहेत. दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’चं आंदोलनही सुरू असून त्यांनी ‘संसद मोर्चा’चंही आयोजन केलं होतं. शबाना आझमी आणि प्रकाश राज यांसारख्या कलाकारांनी या आंदोलनात सहभाग घेतलाय. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही मोर्चे काढले जात आहेत. अभिनेता गुरफतेह सिंह पीरझादा आणि अभिनेत्री प्रतिभा रांटा यांनी मुंबईतील आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यावेळचे फोटोही शेअर केलेत.
आयशा खानही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेली होती. तिनं दावा केलाय की, ती शांतपणे उभी असतानाच पोलिसांनी तिला बळजबरीनं व्हॅनमध्ये बसवलं आणि पोलीस ठाण्यात नेलं. तिनं या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला, मात्र नंतर तिची सुटका करण्यात आली. उर्फी जावेदनंही सांगितलं की, ती आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेली होती, पण पोलीस तिथून सर्वांना बळजबरीनं हटवत असल्यामुळे तिला परत यावं लागलं. याशिवाय सोनाक्षी सिन्हा, हृतिक रोशन, नसीरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांसारख्या कलाकारांनीही या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :