लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार


 Manoj Jarange Patil :  नीट पेपरफुटी प्रकरणावरुन दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळत आहे.  केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. काल या आंदोलनादरम्यान, पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या नंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा वाढताना दिसत आहे. आता या विद्यार्थ्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मैदानात उतरले आहेत. मनोज जरांगे उद्या दिल्लीला जाणार आहेत. 

अमानुषपणे लाठीचार्ज झाला, हे खूप मनाला लागले

दिल्लीत सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उद्या दिल्लीला जाणार आहेत. सकाळी 11 वाजता दिल्ली पोहोचतील. छत्रपती संभाजीनगर वरुन 9 वाजता ते विमानाने दिल्लीला जाणार आहेत. अमानुषपणे लाठीचार्ज झाला, हे खूप मनाला लागल्याचे जरांग पाटील म्हणाले. 
या सरकारचा माज उतरवायला पाहिजे, असंही ते म्हणाले. 

सरकारला किती मस्ती आली आहे

लोकशाही मार्गाने हे आंदोलन करु देणार नसतील तर त्या पोरांनी जगायचं कसं? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. सरकारला किती मस्ती आली यातून दिसते, त्यामुळे सगळ्यांनी साथ देणे गरजेचे आहे. त्यामुळे उद्या मी सकाळी 11. वाजता दिल्लीत पोहचणार आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपली जबाबदारी असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. लागेल ती साथ आम्ही या विद्यार्थ्यांना देणार आहोत असे पाटील म्हणाले. 

देशभरातील शेतकरी संघटनांनी ‘देश बचाओ मोर्चा’ची हाक दिली

नवी दिल्लीत जंतर-मंतर परिसरात ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि आधी झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ हे आंदोलन होत आहे. या आंदोलनाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी सरकारला स्वतः येऊन चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. याशिवाय देशभरातील शेतकरी संघटनांनी ‘देश बचाओ मोर्चा’ची हाक दिली असून, विविध राज्यांतील शेतकरी देखील दिल्लीकडे कूच करत आहेत। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जंतर-मंतर आणि राजघाट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, दिवसेंदिवस विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *