प्लास्टिकची पण डुप्लिकेट नोट? बनावट नोटा चलनात येऊ शकतात? मग या पर्यायाचा फायदा काय? – Marathi News | Plastic currency India Polymer notes A counterfeit plastic note too Can fake notes enter circulation Then what is the point of this currency


Plastic Currency India: देशात पुन्हा एकदा प्लास्टिक नोट तयार करण्याची कवायत सुरू झाली आहे. भारीय रिझर्व्ह बँकेने 10 आणि 20 रुपयांच्या पॉलिमर बँक नोट तयार करण्यासाठी एक प्रायोगिक प्रकल्प आणत आहे. ही नोट कागदी नोटांपेक्षा अधिक टिकाऊ, स्वच्छ आणि अधिक सुरक्षित असेल. 2016 मध्ये सरकारने नोटबंदीचा प्रयोग केला होता. त्यात काही नोटा बंद करण्यात आल्या होत्या. तर काही नवीन नोटा बाजारात आणल्या होत्या. दोन हजारांची नोटही बाजारात आणण्यात आली होती. काळाबाजार आणि बनावट नोटांविरोधात सरकारने हे मोठे पाऊल टाकले होते. पण प्लास्टिकच्याही डुप्लिकेट नोटा तयार करण्यात येतात का? प्लास्टिक नोटांमुळे बनावट नोटांना आळा बसेल का? काय आहे त्याचे उत्तर?

प्लास्टिकची बनावट नोट तयार होऊ शकते?

कागदी नोटांप्रमाणेच पॉलिमर, प्लास्टिकची सुद्धा बनावट, डुप्लिकेट नोट तयार होऊ शकते. पण तांत्रिकदृष्ट्या ती इतकी सरस ठरत नाही. ती बनावट असल्याचे लागलीच उघड होते. कारण प्लास्टिक नोट तयार करणे हे किचकट आणि महागडे ठरते. कागदी नोटांपेक्षा पॉलिमर चलनात सुरक्षा उपाय योजना करण्यात येतात. या नोटा व्यावसायिक प्रिंटर अथवा सहजरित्या इतर ठिकाणी तयार करता येऊ शकत नाही. अशी नोट तयार केली तरीही ती लागलीच ओळखता येणार आहे. परिणामी या नोटांमुळे बनावट नोटांना आळा घालण्यात मोठी मदत होऊ शकतो.

पॉलिमरची डुप्लिकेट नोट तयार करणे अवघड का?

पॉलिमर चलन सुरक्षेच्या कसोट्यांवर तपासले जाते. या नोटेतील एका भागावर कोणतेही शाई नसते. ही नोट पारंपारिक मुद्रण पद्धतीने तयार करण्यात येत नाही. त्यातील अनेक त्रुटी दूर करता येतात. या नोटांचा खरे खोटेपणा तात्काळ तपासता येतो. पॉलिमर नोटांमध्ये ऑप्टिकल व्हेरिएबल डिव्हाईसेजसह आधुनिक होलोग्राफिक सुरक्षा तत्त्वांचा त्यात समावेश असतो. ही नोट विविध कोणातून पाहिल्यावर रंग बदलते. त्यात 3D प्रभाव दिसतो. खास शीटपासून ही नोट तयार करण्यात येते. ही नोट तयार करणे सोपे नाही. त्यासाठी मोठा खर्च येतो. परिणामी बनावट नोट तयार करणे खर्चिक आणि ती चालवणे अधिक तापदायक ठरते.

सामान्य प्लास्टिकपेक्षा नोटांचे पॉलिमर वेगळे आहे. या नोटांच्या उत्पादनांसाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचा आवश्यकता असते. बनावट उत्पादक ही पॉलिमर शीट मिळवणे आणि तिचे उत्पादन करणे अत्यंत कठीण असते. या नोटेमध्ये सुरक्षेची अजून एक काळजी घेतली जाते. बायॲक्सियली ओरिएंटेड पॉलिप्रॉपिलीनचा (Biaxially Oriented Polypropylene) त्यात वापर केल्या जातो. पॉलिमर नोट ही दीर्घकाळ टिकाऊ असते. ही साधारण नोटांपेक्षा तुलनेत 2.5 ते 4 पट अधिक चालते. पॉलिमर नोट पाणी, घाम, तेल वा धुळीने खराब होत नाही. ती फाटत नाही. पण त्यासाठी मोठा खर्च असल्याने प्रायोगिक तत्त्वावर त्याची चाचपणी सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *