Vishal Dadlani On CJP Protest: ‘किती दिवस वळवळणार आहात? लाज वाटू द्या…’, जंतरमंतरवर पोरांची डोकी फोडताच विशाल दादलानींच्या भावनांचा कडेलोट; VIDEO


Vishal Dadlani on Jantar Mantar Protest: गेल्या महिनाभरापासून जंतर-मंतरवर (Jantar Mantar Protest) सुरू असलेल्या आंदोलनाकडे दूर्लक्ष करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी संसदेच्या दारात आलेल्या अस्वस्थ तरुण-तरुणींवर पोलिसांनी लाठीमार केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दिल्ली पोलिसांनी आंदोलन विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली. अनेकांची डोकी फुटली. देशभरातून सरकार विरोधाचा रोष वाढला आहे. सोशल मीडियावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचे आणि जमाव पांगवण्यासाठी केलेल्या क्रूरतेचे video व्हायरल होत आहेत. दरम्यान, अनेकांनी सोमवारी घडलेल्या या प्रकारानंतर सरकारला सुनावलंय. गायक विशाल दादलानी (Vishal Dadlani) यांनी घडल्या प्रकारानंतर केलेल्या एका व्हिडिओचे सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

काय म्हणाले विशाल दादलानी?

‘आज मुलांवर हात उचललाय यांनी. मुलं जे आपल्या हक्कासाठी उभारली होती.आपल्या भविष्यासाठी,या देशाच्या,आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी. त्यांना कुत्र्यांसारखं मारण्यात आलंय रस्त्यावर.  लाठ्यांनी, अश्रुदुराच्या नळकांड्या वगैरे वगैरे..काय बोलावं! जे लोक अजूनही गप्प आहेत, तुम्ही कसे जगताय यासोबत. कितीवेळा सलाम ठोकणार आहात? किती दिवस वळवळणार आहात, किडे- मुंग्या आहात काय? लाज वाटू द्या. या देशाचं मीठ खाल्लं आहे, खाल्ल्या मिठाला आतातरी जागा. थोडंसं! ‘ असं विशाल दादलानी यांनी व्हिडिओ करत म्हटलं.

नीट (NEET) आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता, पेपरफुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांचा संघर्ष सुरू असताना, मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनी आंदोलनस्थळी भेट दिली. सोमवारी, टेलिव्हिजन स्टार्सपासून ते बॉलिवूड अभिनेत्यांपर्यंतच्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर विद्यार्थ्यांच्या या मागणीच्या समर्थनार्थ आवाज उठवला. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवर (Jantar Mantar Protest) अनेक आंदोलकांना रोखून धरले होते. मात्र, उर्वरित आंदोलकांचा एक मोठा जमाव काल दुपारी संसद भवनापासून काही अंतरावर जाऊन धडकला. यानंतर दिल्ली पोलिसांनी या आंदोलकांवर बेछूट लाठीमार केला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची डोकी फुटली असून अनेकजण जखमी झाले आहेत.

 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *