Last Updated:
रविवारी लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 27 रननी पराभव झाला, याचसोबत टीम इंडियाने वनडे सीरिज 2-1 ने गमावली.
मुंबई : रविवारी लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 27 रननी पराभव झाला, याचसोबत टीम इंडियाने वनडे सीरिज 2-1 ने गमावली. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाला एकही सीरिज जिंकता आली नाही. आयर्लंडमधल्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाचा 2-0 ने आणि इंग्लंडमधल्या टी-20 सीरिजमध्ये 4-0 ने पराभव झाला, त्यानंतर आता टीम इंडियाने वनडे सीरिजही गमावली. तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी उत्कृष्ट कामगिरी केली, पण बॉलरनी टीम इंडियाचा घात केला.
टीम इंडियाचा दिग्गज ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दुखापतीमुळे या सीरिजमध्ये खेळू शकला नाही तर हर्षित राणालाही दुखापत झाली, त्यामुळे तो दौऱ्याच्या मधूनच बाहेर झाला. हार्दिक आणि हर्षितच्या गैरहजेरीमध्ये काही युवा खेळाडूंना संधी दिली गेली, पण त्यांना या संधीचं सोनं करता आलं नाही. त्यामुळे 3 खेळाडूंना वनडे टीममधून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
शिवम दुबे
वनडे आणि टी-20 मध्ये फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून टीम मॅनेजमेंटची पहिली पसंती हार्दिक पांड्या आहे, तसंच नितीश कुमार रेड्डी हादेखील पर्याय आहे, पण त्यालाही दुखापत झाली, त्यामुळे शिवम दुबेला संधी मिळाली. इंग्लंडविरुद्ध दुबेने 2 मॅच खेळल्या ज्यात त्याने 2 विकेट घेतल्या आणि एका इनिंगमध्ये तो शून्य रनवर आऊट झाला.
इशान किशन
अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये विराट कोहलीला दुखापत झाली त्यामुळे इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर खेळला आणि त्याने दुसऱ्या सामन्यात शतक केलं. या कामगिरीमुळेच इशानची इंग्लंड सीरिजसाठी निवड झाली. इंग्लंडविरुद्ध इशान दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेमध्ये खेळला पण त्याला फक्त 71 रनच करता आले.
प्रिन्स यादव
फास्ट बॉलर प्रिन्स यादवने यावर्षी अफगाणिस्तानविरुद्धच्या सीरिजमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात प्रिन्सला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. यात त्याने 10 ओव्हरमध्ये 79 रन दिल्या आणि फक्त एक विकेट घेतली. याआधी अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही प्रिन्स यादवची धुलाई झाली होती.
Mumbai,Maharashtra
Jul 20, 2026 11:55 PM IST
