CJP Parliament March नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरुन कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. दिल्ली पोलिसांच्या पुरुष पोलिसांनी मुलींवर लाठीचार्ज केल्याचा आरोप केला आहे. हे सरकार नीटच्या 20 विद्यार्थ्यांचा जीव घेतल्यानंतर देखील समाधानी नाहीत. आता ते दुसऱ्यांचं रक्त वाहायचं आहे. पोलिसांनी महिला आंदोलकांवर लाठी हल्ला केल्याचं अभिजित दिपके म्हणाले.
पोलीस अधिकाऱ्यांकडून मुलींवर लाठीचार्ज
एएनआय या वृत्त संस्थेसोबत बोलताना कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दिपके म्हणाले की पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी मुलींवर लाठीहल्ला केला. सरकारकडन गुंडागर्दी केली जातेय. या सरकारमुळं 20 मुलांनी आत्महत्या केली आहे. मुलांचं रक्त वाहायचं आहे, असं अभिजीत दिपके म्हणाले.
याशिवाय सीजेपीनं एक्सवर पोस्टवर करत म्हटलं की अभिजीत दिपके, सौरव दास, आशुतोष रांका आणि सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अजून जंतर मंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. ते सर्व जण केरळ हाऊस समोर आहेत. शांततापूर्ण विरोध संपणार नाही, असं सीजेपीकडून सांगण्यात आलं आहे.
आम्ही तिरंगा हाती घेतला, त्यांनी लाठी उचलली : सीजेपीची पोस्ट
सीजेपीनं सोशल मीडियावर पोस्ट करत दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईवर भाष्य केलं. सीजेपीन म्हटलं की आम्ही तिरंगा हाती घेतला, त्यांनी लाठी उचलली. आम्ही पुस्तकं हातात घेतली, त्यांनी अश्रू धुराच्या नळकांड्या चालवल्या. आम्ही संविधान दाखवलं, त्यांनी हुकुमशाही केली. दिल्ली पोलिसांनी संसदेतील त्यांच्या मालकांच्यावतीनं निष्पाप विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली, यासाठी आजचा दिवस लक्षात ठेवला जाईल, असं सीजेपीनं म्हटलं.
सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरुच
पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना नवी दिल्लीतील सफदरगंज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मात्र, सोनम वांगचुक यांनी 23 व्या दिवशी देखील उपोषण सुरु ठेवलं आहे. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केल्यानं उपोषण सुरु ठेवणार असल्याचं वांगचुक यांनी म्हटलं. रुग्णालयातून एक पोस्ट करत शिक्षणमंत्र्यांची जबाबदारी निश्चित होत नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहिल, असं म्हटलं.
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप