Gold-Silver Price Today 20 July 2026: जर तुम्ही आज सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सर्वात आधी त्याचे ताजे भाव नक्की जाणून घ्या. २० जुलै २०२६ रोजी सराफा बाजारात सोन्याच्या (Gold-Silver Price Today) दरांमध्ये किरकोळ वाढ पाहायला मिळाली आहे. एकीकडे सोन्याच्या दरात ०.०१% ची किरकोळ वाढ झाली (Gold-Silver Price Today) असून २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १० रुपयांनी महाग होऊन १,४५,६६० रुपयांवर पोहोचले आहे. दुसरीकडे, चांदीच्या भावात कोणताही बदल झालेला नसून ती २,३६,९० प्रति किलोग्राम या पातळीवर व्यवहार करत आहे.(Gold-Silver Price Today)
Gold-Silver Price Today 20 July 2026: आज सोने किती महाग झाले?
आज २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ०.०१% ची किरकोळ वाढ नोंदवली गेली आहे. या वाढीनंतर १० ग्रॅम २४ कॅरेट सोने १० रुपयांनी महाग होऊन १,४५,६६० रुपयांवर पोहोचले आहे. तसेच, २२ कॅरेट सोनेदेखील १० रुपयांच्या वाढीसह १,३३,५२० रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर व्यवहार करत आहे.
Gold-Silver Price Today 20 July 2026: चांदीच्या भावात किती बदल झाला?
सोन्यातील वाढीदरम्यान चांदीचे दर आज स्थिर राहिले आहेत. सध्या चांदी २,३६,९०० रुपये प्रति किलोग्राम या दराने विकली जात आहे. म्हणजेच, गेल्या व्यवहाराच्या दिवसाच्या तुलनेत यात कोणताही बदल झालेला नाही.
Gold-Silver Price Today 20 July 2026: सोन्याचे दर का वाढत आहेत?
बाजार तज्ज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक अनिश्चितता, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची वाढती मागणी आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढणारा कल यांमुळे सोन्याच्या किमतीत सातत्याने मजबुती दिसून येत आहे. जरी आजची वाढ अत्यंत किरकोळ असली तरीही दरवाढ कायम आहे.
Gold-Silver Price Today 20 July 2026: सध्या सोने खरेदी करावे का?
जर तुम्ही लग्नकार्य, सण-उत्सव किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करू इच्छित असाल, तर बाजारावर बारीक लक्ष ठेवा. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि डॉलरच्या वाटचालीच्या आधारावर येत्या दिवसांत सोन्याच्या दरांमध्ये चढ-उतार सुरूच राहू शकतात. सोने खरेदी करताना नेहमी BIS हॉलमार्क नक्की तपासा आणि पक्के बिल (पावती) घ्या. तसेच, चांदी खरेदी करताना तिची शुद्धता तपासून घ्या.
22 आणि 24 कॅरेट सोनं म्हणजे नेमकं काय?
वजन मोजण्यासाठी किलो हे एकक आहे. पाणी मोजण्यासाठी लीटर या एककाचा वापर केला जातो. त्याच पद्धतीने सोन्याची शुद्धता मोजायची असेल तर कॅरेट या एककाचा वापर केला जातो. जेव्हे कॅरेट जास्त तेवढेच सोने शुद्ध असे मानले जाते. 24 कॅरेट सोने हे सर्वांत शुद्ध असल्याचे बोलले जाते. 24 कॅरेट सोनेच्या शुद्धता ही 99.9 टक्के असते. त्यामुळे या सोन्याचा भावही इतर सोन्याच्या तुलनेत अधिक असतो. 24, 22, 18, 14 अशा वेगवेगळ्या प्रकारचे सोने असते. 24 कॅरेट सोने वगळता इतर सर्व प्रकारच्या सोन्यात तांबे, चांदी असे इतर धातू मिसळले जातात. सोन्याच्या आभूषणांना मजबुती यावी म्हणून हे धातू सोन्यात मिसळले जातात. सोन्याची गुववत्ता ही बीआयएस या संस्थेतर्फे ठरली जाते. त्यामुळे हॉलमार्क असलेले सोनेच खरेदी करायला हवे, असा सल्ला दिला जातो.
गुंतवणुकीसाठी कोणतं सोनं योग्य आहे?
पैशांची गुंतवणूक करायची असलेल तर अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सोने जेवढे शुद्ध असेल भविष्यात तुम्हाला तेवढेच जास्त पैसे मिळतील. याच कारणामुळे 24 कॅरेट सोन्याचा भाव आज दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यातही 24 कॅरेट सोन्याचा दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांच्या गुंतवणुकीसाठी 24 कॅरेट सोने हा सर्वोत्तम पर्याय आहे. पैशांच्या गुंतवणुकीसाठी 22 कॅरेट सोने हा पर्यायदेखील चांगला आहे.
दागिन्यांसाठी कोणते सोने योग्य आहे?
सोन्याचे आभूषणं करायची असतील तर ते 24 कॅरेट सोन्यापासून तयार करता येत नाहीत. कारण 24 कॅरेट सोने हे फार नरम असते. ते लगेच तुटते. त्यामुळेच 22 कॅरेट किंवा त्यापेक्षा कमी कॅरेटच्या सोन्यापासून आभूषणं तयार करता येऊ शकतात. अशा सोन्यात तांबे, चांदी अशा प्रकारचे धातू मिसळले जातात.