BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं…


BCCI On Rohit Sharma Retirement: 2027 सालच्या आगामी वन डे (IND vs ENG ODI) विश्वचषकात खेळण्याच्या आशेवर पाणी फेरलं जाण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) कसोटी आणि ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आधीच निवृत्त झाला आहे. आता इंग्लंड दौऱ्यातली लॉर्डसची तिसरी वन डे रोहितच्या कारकीर्दीतली अखेरची वन डे ठरू शकते, अशी शक्यता काही प्रसिद्धीमाध्यमांनी वर्तवली आहे. 

बीसीसीआयच्या निवड समितीनं 2027 सालच्या वन डे विश्वचषकासाठी नव्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं निवड समितीच्या भविष्यातील योजनांचा रोहित शर्मा हा भाग नसल्याचं त्याला कळवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं इंग्लंडविरुद्धच्या लॉर्डसवरच्या तिसऱ्या वन डेनंतर रोहित शर्मा वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्त होण्याचा निर्णय घेऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरच आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) प्रतिक्रिया दिली आहे. 

भारतीय वन डे संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकिया यांनी फेटाळून लावलीय. रविवारी इंग्लंडविरोधात लॉर्ड्सवर होणाऱ्या सामन्यानंतर रोहित शर्मा वन डेतून निवृत्त होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, ही चर्चा त्यांनी फेटाळून लावलीय. त्यामुळे आगामी वन डे सामन्यात रोहित शर्मा टीम इंडियाचं प्रतिनिधीत्व करताना दिसणार आहे. तर आधीच रोहित शर्माने कसोटी आणि ट्वेन्टी ट्वेन्टी मधून निवृत्ती घेतलीय. 

BCCI चं म्हणणं काय? (BCCI On Rohit Sharma Retirement)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) रोहित शर्माच्या निवृत्तीबाबतच्या अफवांना पूर्णविराम दिलाय. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर होणाऱ्या एकदिवसीय सामन्यानंतरही रोहित शर्मा टीम इंडियासाठी खेळणं सुरूच ठेवेलंय, असं स्पष्टीकरण बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर रोहित शर्मा या प्रकारातील (फॉर्मॅटमधील) क्रिकेटमधून निवृत्ती घेईल, असं वृत्त माध्यमांमध्ये आलं होतं. पण, आता बीसीसीआयनं मात्र हे वृत्त फेटाळून लावलंय.

‘पीटीआय’शी (PTI) बोलताना बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले की, “रोहित शर्माच्या भविष्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मला पूर्ण आत्मविश्वासानं सांगायचंय की, रोहित रविवारी लॉर्ड्सवर आपला शेवटचा सामना खेळणार असल्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही…”

दरम्यान, निवड समिती आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी 2027 च्या एकदिवसीय (ODI) विश्वचषकाच्या योजनांमधून रोहित शर्माला वगळल्याचं बोललं जात असतानाच देवाजित सैकिया यांचं वक्तव्य समोर आलं आहे. संघ व्यवस्थापनाला युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे आणि सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वालला स्थान देण्यासाठी रोहित शर्माला वगळलं जाऊ शकतं, अशी चर्चा रंगली होती.

रोहित शर्मा खेळणे सुरूच ठेवणार (Rohit Sharma In ODI Series)

बीसीसीआयच्या सचिवांनी पुढे सांगितले की, “रोहित शर्मा हा भारतीय एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य आहे आणि जोपर्यंत तो भविष्यातील योजनांचा भाग असेल, तोपर्यंत तो देशाचं प्रतिनिधित्व करत राहील. थोडक्यात सांगायचं तर, लॉर्ड्सवरील सामना हा त्याचा शेवटचा सामना नसेल…”

दरम्यान,  सध्या टीम इंडिया (Team India) इंग्लंड (IND vs ENG) दौऱ्यावर असून तीन सामन्यांची वनडे मालिका (ODI Series) सुरू आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना कार्डिफ इथे खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडनं टीम इंडियाचा 4 विकेट्सनी पराभव केलाय. या पराभवानंतर मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली असून आता लॉर्ड्सवरील तिसरा वनडे सामना निर्णायक ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rohit Sharma Retirement: ‘रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?’; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *