Last Updated:
Nanded Crime News : ट्यूशनच्या सोडवण्याचा बहाण्याने त्यांनी गाडी सुरू केली अन् तिथं त्यांनी शेवटचा प्रवास सुरू केला. त्याचवेळी त्यांनी व्हॉट्स अॅप स्टेटस ठेवलं.
Nanded Crime News : गेल्या दोन वर्षांपासून वरिष्ठांकडून होणारा मानसिक छळ आणि त्रासाला कंटाळून एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने आपल्या दोन निष्पाप मुलांसह कार गोदावरी नदीत टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. शालेय पोषण आहारातील कथित गैरव्यव्हाराबाबतच्या चौकशीवरून सुनील नारायण मोरे यांना मानसिक त्रास दिला जात होता. त्यानंतर त्यानी आपल्या मुलासह आणि मुलीसह मृत्यूचा गवसणी घातली. ट्यूशनच्या सोडवण्याचा बहाण्याने त्यांनी गाडी सुरू केली अन् तिथं त्यांनी शेवटचा प्रवास सुरू केला. त्याचवेळी त्यांनी व्हॉट्स अॅप स्टेटस ठेवलं.
शालेय पोषण आहाराचा अतिरिक्त कार्यभार
झालं असं की, भोकर तालुक्यातील बेंबर येथील मूळ रहिवासी असलेले सुनील मोरे हे नांदेड शहरातील अंबानगर परिसरात वास्तव्यास होते. सुनील मोरे आणि त्यांची पत्नी पोटा येथील झेडपी शाळेत शिक्षक होते. 2023 ते 2025 या काळात त्यांच्याकडे शालेय पोषण आहाराचा अतिरिक्त कार्यभार होता. यातील तक्रारीनंतर तत्कालीन गटशिक्षणाधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे आणि केंद्रप्रमुख शिवाजी कदम यांनी चौकशी केली होती. या चौकशीतूनच आपला सतत मानसिक छळ सुरू असल्याचा गंभीर आरोप नातेवाइकांनी केला आहे.
मला माफ करा.. म्हणत व्हॉट्स अॅपवर स्टेटस
शुक्रवारी सकाळी मुलांना ट्यूशनला सोडण्याच्या बहाण्याने त्यांनी घर सोडलं अन् मला माफ करा.. म्हणत व्हॉट्स अॅपवर एक स्टेटस ठेवलं. त्याआधी त्यांनी एका मित्राला फोन केला अन् आपलं दु:ख व्यक्त केलं. त्यावेळी त्यांनी आपण टोकाचं पाऊल उचलत असल्याचं देखील सांगितलं अन् दोन चिमुकल्या मुलांसह गाडी नदीत पाडली अन् मृत्यूचा जवळ केलं. यामध्ये तिघांची मृत्यू झाला आहे. मित्राला फोन करून त्याने सगळे पुरावे लॅपटॉप, मोबाईल अन् कारमध्ये असल्याचं सांगितलं होतं.
तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले
घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि मुदखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नदीपात्र खोल असल्याने कार शोधण्यासाठी एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने अथक परिश्रमानंतर कार आणि तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. फोन केलेल्या मित्राने ‘आपण कायदेशीर लढा देऊ, टोकाचा निर्णय घेऊ नका,’ अशी विनवणी केली होती. पण खचलेल्या मोरेंनी टोकाचं पाऊल उचललं.
Nanded,Maharashtra
Jul 18, 2026 10:48 AM IST
Nanded Crime : ‘मला माफ करा…’, चिमुकल्या मुलांसह शिक्षकाने स्वत:ला संपवलं! व्हॉट्सॲप स्टेटस अन् लॅपटॉपमध्ये पुरावे, मित्राला शेवटचा फोन करून काय सांगितलं?
