NEET Exam Paper: रात्रंदिवस अभ्यास केला, आजारी पडला, जेवलाही नाही, कित्येक रात्री…; 522 गुण मिळणे अपेक्षित, मात्र स्कोर कार्डवर अवघे 95 गुण, बीडच्या सोहमच्या आई वडिलांचा संताप


बीड : नीट परीक्षेचा 16 जुलैला निकाल जाहीर झाला यानंतर बीडमधील सोहम नितीन गवते या विद्यार्थ्याने अँसर की नुसार 522 मार्क (NEET Exam Result Mess) मिळण्याची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्ष स्कोर कार्डवर अवघे 95 गुण मिळाले यामुळे सोहमचे पालक भावुक झाल्याचे दिसून आले आहेत. यावेळी त्याच्या आई वडिलांना अश्रू अनावर झाल्याचं (NEET Exam Result Mess) दिसून आलं आहे. या प्रकाराबाबत आम्ही हायकोर्टात जाणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. माझ्या मुलाने रात्रंदिवस अभ्यास केला, तो कधीही त्याच्या खोलीच्या बाहेर आला नाही. तो केवळ दोन-तीन तासच झोपायचा. कधी कधी त्याने जेवणही केलं नाही. काही वेळा तो आजारी पडला असं त्याच्या आईने एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. निकाल बघून तो आम्हाला बराच वेळ काहीच बोलला नाही त्याला काही सुचत नव्हतं,असं सोहमची आई मनीषा नितीन गवते, यांनी पुढे बोलताना सांगितलं.(NEET Exam Result Mess)

NEET Exam Result Mess : माझ्या मुलाने 180 पैकी 158 प्रश्न सोडवले पण…

सोहमचे वडील नितीन गवते यांनी पुढे एबीपी माझाशी बोलताना म्हटलं की, आम्ही ओएमआर आणि ‘अँसर की’ शीट चेक केल्यावर आम्हाला तफावत दिसून आली. माझ्या मुलाने 180 पैकी 158 प्रश्न सोडवले आहेत. 35 प्रश्न बरोबर आले 23 प्रश्न चुकले त्याला 522 मार्क पडायला पाहिजे होते, मात्र स्कोर कार्डवर 95 गुण आले. इतकी तफावत कशी शक्य आहे. पालक या नात्याने एनटीएकडे मागणी करत ही दुरुस्ती करावी अशी मागणी सोहमच्या वडिलांनी केली आहे. आम्हाला न्याय न दिल्यास आम्ही हायकोर्टात जाणार आहोत. मी शेती करून मुलाला शिकवलं आहे, असंही पुढे ते म्हणालेत.(NEET Exam Result Mess)

NEET Exam Result Mess : 522 गुण मिळणे अपेक्षित, मात्र स्कोर कार्डवर अवघे 95 गुण

बीड मधील सोहम नितीन गवते या विद्यार्थ्याने कोणताही क्लास न लावता दिवस-रात्र एक करून अभ्यास केला. वेबसाईटवरील माहितीनुसार त्याला 522 गुण मिळणे अपेक्षित होते. तसा पुरावाही त्याच्याकडे आहे. मात्र एनटीए मार्फत ई-मेलवर आलेल्या स्कोर कार्डवर त्याला अवघे 95 गुण दाखवण्यात आले आहे. परिणामी या प्रकरणामुळे सोहम गवतेला जबर धक्का बसला आहे. तर खचलेल्या सोहमने आता समूपदेशकांकडे धाव घेतली असून त्याच्या पालकाने न्यायालयात जाण्याची तयारी दाखली आहे.

NEET Exam Result Mess : पुन्हा परीक्षा घेण्यात आली अन्…

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण असलेली राष्ट्रीय पातळीवरील ‘नीट यूजी २०२६’ परीक्षा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची मालिका अजूनही संपताना दिसत नाही. ३ मे रोजी झालेली परीक्षा पेपर फुटीच्या आरोपांमुळे रद्द झाल्यानंतर, २१ जून रोजी देशभरात पुन्हा परीक्षा घेण्यात आली. १६ जुलै रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. पण, आता निकालात प्रचंड गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. अधिकृत ‘आन्सर की’नुसार (उत्तरपत्रिका) ५२२ गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्याला प्रत्यक्ष स्कोअर कार्डवर मात्र अवघे ९५ गुण मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप व तणावाचे वातावरण आहे, आता पालकांनी या प्रकरणी संताप व्यक्त करत याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिलेला आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *