एका हॉलिवूड चित्रपटाची एन्ट्री अन् बॉलिवूडच्या सगळ्यांचंच धाबं दणाणलं; ‘धमाल 4’चा वेग मंदावला? बॉक्स ऑफिसवर मोठी उलथापालथ


Dhamaal 4 Box Office Collection: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ख्रिस्तोफर नोलनच्या हॉलिवूडपटाची जगभरातील चित्रपटगृहामध्ये एन्ट्री झालीय. ‘ द ओडिसी’ प्रदर्शित होताच मोठमोठ्या बॉलिवूड चित्रपटांचे धाबे दणाणले आहेत. 10 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या ‘धमाल 4’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर आठ दिवस पूर्ण झाले आहेत. ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘अल्फा’ला मागे टाकल्यानंतर आता या चित्रपटासमोर ख्रिस्तोफर नोलनच्या ‘द ओडिसी’चे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. शुक्रवारचे बॉक्स ऑफिस आकडे समोर आले असून, आठव्या दिवशी ‘धमाल 4’ने किती कमाई केली, ते जाणून घेऊया.

‘द ओडिसी’चा ‘धमाल 4’च्या कमाईवर किती परिणाम?

‘द ओडिसी’ प्रदर्शित झाल्यानंतर शुक्रवारी ‘धमाल 4’च्या कमाईवर स्पष्ट परिणाम दिसून आला. आतापर्यंत चित्रपट दररोज सुमारे 6 कोटी रुपयांच्या आसपास कमाई करत होता; मात्र शुक्रवारी कमाईत मोठी घसरण नोंदवली गेली.

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘धमाल 4’ने आतापर्यंत 7,885 शोसह देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 99.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रिलीजच्या आठव्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी चित्रपटाने 3.95 कोटी रुपयांची कमाई केली, जी मागील दिवसांच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी आहे. 

‘धमाल 4’ कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचलेला ‘धमाल 4’ जगभरातही चांगली कामगिरी करत आहे. अजय देवगणच्या या मल्टिस्टार चित्रपटाने आतापर्यंत 132.74 कोटी रुपयांचं जागतिक कलेक्शन केलं आहे. त्यापैकी 18.25 कोटी रुपये ओव्हरसीज मार्केटमधून आले आहेत. शुक्रवारी कमाईत घसरण झाली असली तरी, आता ‘द ओडिसी’च्या प्रचंड क्रेझसमोर ‘धमाल 4’ पुन्हा जोरदार पुनरागमन करू शकते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. OTT रिलीजबाबत बोलायचं झाल्यास, थिएटरमधील प्रदर्शनानंतर ‘धमाल 4’ नेटफ्लिक्स (Netflix) वर स्ट्रीम होणार आहे.

‘द ओडिसी’ची एवढी क्रेझ का?

क्रिस्टोफर नोलनचा नवा चित्रपट ‘द ओडिसी’ (The Odyssey) प्रदर्शित होण्यापूर्वीच जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. भारतातही या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुकता असून, IMAX शोच्या तिकिटांसाठी चाहते 700 ते 3000 रुपये मोजण्यासही तयार आहेत. ‘इन्सेप्शन’, ‘इंटरस्टेलर’, ‘डंकर्क’, ‘टेनेट’ आणि ऑस्कर विजेता ‘ओपेनहायमर’ यांसारखे चित्रपट दिल्यानंतर नोलन यांचा प्रत्येक नवा चित्रपट हा चाहत्यांसाठी मोठा सिनेमॅटिक इव्हेंट ठरतो. त्यामुळे ‘द ओडिसी’बाबतही प्रचंड उत्सुकता आहे.हा चित्रपट प्राचीन ग्रीक कवी होमर यांच्या ‘द ओडिसी’ या महाकाव्यावर आधारित आहे. ट्रोजन युद्धानंतर ओडिसियसच्या घरी परतण्याच्या साहसी आणि रोमांचकारी प्रवासाची कथा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *