Last Updated:
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवास्थानी पोहोचले. त्यांच्यासोबत
मुंबई: मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. आता जयंत पाटील हे शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवास्थानी पोहोचले. त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड देखील सोबत असल्याची माहिती समोर आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भाजपमध्ये विलीनीकरणाची चर्चा रंगली आहे. असं असताना राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान नंदनवन या ठिकाणी ही बैठक पार पडली. ४५ मिनिटं तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
मंगळवारी जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला होता आणि ईश्वरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या रद्दबातल होण्याबाबत भेटीची वेळ मागितली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत असल्याने मुंबईत आल्यावर भेटतो असे सांगितले होते. आज एकनाथ शिंदे यांनी भेटीसाठी वेळ दिल्याने जंयत पाटील हे जितेंद्र आव्हाड यांच्यासह भेटण्यासाठी गेले होते. तर “नगर विकास खात्यातील आणि माझ्या काही वैयक्तिक कामांसाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नगराध्यक्षांच्या अपात्रतेसंदर्भात अपील केल्याचंही त्यांच्या कानावर घातलं”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. त्यानंतर जयंत पाटील हे भेटीसाठी दाखल झाले होते. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेते हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली. पण, दुसऱ्या दिवशी पटेल आणि तटकरेंसोबत भेट झाली असं जयंत पाटील यांनी सांगितलं होतं. पण, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांना ऊत आलं आहे.
Mumbai,Maharashtra
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आता जयंत पाटील पोहोचले एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी, काही तरी मोठं होणार?
