Dhamaal 4 : कॉमेडी अशी की पोट धरून हसाल..; फक्त 6 दिवसांत ‘धमाल 4’ची तब्बल इतकी कमाई – Marathi News | Dhamaal 4 box office collection in working days ajay devgn film holding strong


सहसा वीकेंडला प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करतात, पण जेव्हा मधल्या वारीही शोज हाऊसफुल असतात, तेव्हा त्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई सुरू आहे, असं समजायला हरकत नाही. अजय देवगणच्या ‘धमाल 4’ या चित्रपटाच्या बाबतीतही असंच काहीसं घडताना दिसतंय. खरंतर काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारचा ‘वेलकम टू द जंगल’ हा कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ‘धमाल 4’सुद्धा त्याच जॉनरचा असल्याने तितका हिट होईल का, अशी शंका निर्मात्यांच्या मनात होती. मात्र प्रत्यक्षात ‘धमाल 4’ला ‘वेलकम टू द जंगल’पेक्षाही चांगला प्रतिसाद मिळतोय. वीकेंडसोबतच मधल्या वारीही प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता अजय देवगणचा हा चित्रपट मोठी कमाई करण्यासाठी सज्ज आहे, असं म्हणायला हरकत नाही.

सोमवारी बॉक्स ऑफिसवरील मजबूत पकड आणि मंगळवारी स्वस्त तिकिटांची ऑफर नसतानाही ‘धमाल 4’ने तगडी कमाई केली होती. त्यामुळे बुधवारी या गतीची खरी परीक्षा होती. या परीक्षेत आता ‘धमाल 4’ पास झाला आहे, हे आकड्यांवरून स्पष्ट होतंय. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 124.36 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर भारतातील नेट कमाईचा आकडा 89.75 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. परदेशातही या चित्रपटाची 17.25 कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

‘धमाल 4’ची आतापर्यंतची कमाई-

पहिला दिवस (शुक्रवार)- 14 कोटी रुपये
दुसरा दिवस (शनिवार)- 22.50 कोटी रुपये
तिसरा दिवस (रविवार)- 28.50 कोटी रुपये
चौथा दिवस (सोमवार)- 8.75 कोटी रुपये
पाचवा दिवस (मंगळवार)- 9.50 कोटी रुपये
सहावा दिवस (बुधवार)- 6.50 कोटी रुपये

‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार, प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी ‘धमाल 4’ने 6.50 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं आहे. सोमवारच्या तुलनेत या कमाईत जवळपास 25 टक्क्यांची घट पहायला मिळाली. मात्र बॉक्स ऑफिस ट्रेंडच्या हिशोबाने हा चित्रपट अजूनही चांगली कमाई करतोय. ही कमाईच या गोष्टीचा पुरावा आहे की वर्किंग डेजमध्येही ‘धमाल 4’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटर्समध्ये गर्दी करत आहेत. ही यासाठीही महत्त्वाची बाब आहे, कारण या चित्रपटाला फारसे सकारात्मक रिव्ह्यूज तर मिळाले नाहीत, तरीही त्यातील कॉमेडी प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *