मोठी बातमी! पवार गट एनडीएसोबत जाणार? राज्यात अर्थमंत्रीपद? रात्रीच्या भेटीत काय घडलं? बडा नेता थेट सीएमकडे… – Marathi News | There is speculation that Sharad Pawar will join the NDA and that the Finance portfolio will go to his party meeting regarding this took place yesterday at Varsha Bungalow in Mumbai


काल मध्यरात्री उशीरा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल अचानक वर्षा बंगल्यावर पोहोचले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगताना दिसतंय की, शरद पवार NDA सोबत जाणार आहेत. शरद पवार कोणताही निर्णय घेऊ शकतात. यामुळे जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला महत्वप्राप्त झाले. जयंत पाटील, प्रफुल पटेल आणि सुनीर तटकरे एकाच वेळी वर्षा बंगल्यावर पोहोचले. यादरम्यान काही वेळ बैठक सुरू होती. शरद पवार एनडीएमध्ये गेले तर हा महाविकास आघाडीला मोठा झटका म्हणावा लागू शकतो. अर्थमंत्रिपदासाठी हालचाली सुरू असल्याचे बघायला मिळतंय.

अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. जर शरद पवार एनडीएमध्ये सहभागी झाले तर त्यांच्या पक्षाकडे अर्थमंत्रिपद जाऊ शकते, तश्या हालचाली सुरू आहेत. अजिप पवार यांच्या पक्षाच्या वाट्याला अर्थमंत्रिपद आले होते. मात्र, सध्या ते फडणवीसांकडेच आहे. जयंत पाटील यांना अर्थमंत्रिपदाचा अनुभव आहे.

जर एनडीएमध्ये शरद पवार यांचा पक्ष सहभागी झाला तर जयंत पाटील थेट अर्थमंत्री होऊ शकतात. अर्थमंत्रिपद आमच्याकडेच राहावे, याकरिता अजित पवारांचा पक्ष आग्रही आहे. अर्थमंत्रिपदाकरिता दोन्ही राष्ट्रवादीमध्ये हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आहेत. यादरम्यान जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट ईश्वरपूर नगराध्यक्षाच्य अपात्रेबद्दल घेतली.

यावेळी माजी भेट सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल याच्यासोबत झाली नसल्याचे जयंत पाटलांचे म्हणणे आहे. या तिन्ही नेत्यांनी एकाच वेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले नाही. सध्या अजित पवारांच्या पक्षाची सर्व सूत्रे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे आहेत. मात्रक, तिन्ही नेते एकाच वेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *