Sayaji Shinde On Emotional Memory With Ajit Pawar: मराठी सिनेसृष्टीसोबतच (Marathi Film) हिंदी (Hindi Films) आणि साऊथ सिनेमांमध्ये (South Film Industry) गाजणारं मराठमोळं नाव म्हणजे, अभिनेते सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde). कधी खलनायकी भूमिका साकारुन तर कधी नायक म्हणून पडद्यावर येत सयाजी शिंदेंनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अभिनय क्षेत्रासोबत सयाजी शिंदे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यासोबत सामाजिक क्षेत्रातही सयाजी शिंदे यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे. ते पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीसारख्या उपक्रमांमध्ये सक्रिय असतात. सयाजी शिंदे राजकारणातही सक्रीय आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये प्रवेश केला आहे. आपल्या सर्वांनाच त्यांची आणि दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची मैत्री माहीत आहे. दोघांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याची आणि घनिष्ठ मैत्री होती. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना अजित पवार यांनी अजित पवारांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. मुलाखतीत बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. तसेच, यावेळी त्यांनी अजित पवारांनी दिलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीचा उल्लेख केला आणि त्या मूर्तीशी जोडलेल्या आठवणी सांगितल्या. सयाजी शिंदे यांनी सांगितलं की, अजित पवारांनी वाढदिवसाला भेट म्हणून दिलेली विठ्ठलाची मूर्ती आजही जपून ठेवलीय.
महाराष्ट्रभर सावली पेरण्याचा ध्यास घेऊन काम करणारे आमचे सहकारी, सुप्रसिद्ध अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे प्रणेते श्री. सयाजी शिंदे …” width=”230″ height=”309″ />
अभिनेते सयाजी शिंदे नेमकं काय म्हणाले? (Sayaji Shinde On Ajit Pawar)
मराठी अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की, “माझ्या वाढदिवसाला अजितदादा आले होते. त्यांनी मला विठ्ठलाची मूर्ती भेट म्हणून दिली होती. त्या प्रेमापोटी आम्ही ती आजही जपून ठेवली आहे…”
अजित दादांनी दिलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीबद्दल बोलताना सयाजी शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, “विठोबा हा असा देव आहे, जो प्रत्येकाच्या मनात असतो. शेतात, निसर्गात, झाडांमध्ये जो देव अनुभवायला मिळतो, तोच खरा विठोबा आहे. विठ्ठल-रुक्मिणी हे आदर्श आणि संस्कारांचं प्रतीक आहेत…”
दरम्यान, सयाजी शिंदे यांनी केवळ मराठीच नाहीतर हिंदी, मराठी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केलंय. खलनायक आणि व्यक्तिरेखांच्या भूमिकांमधून त्यांनी महत्त्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या गाजलेल्या सिनेमांमध्ये ‘शूल’ (1999) (हिंदी), ‘औरों में कहां दम था’ (2024) (हिंदी), ‘पोकिरी’ (2006) (तेलुगु), ‘कल्ला’ (2018) (तमिळ), आणि मराठी चित्रपट ‘घर बंदुक बिर्याणी’ (2023) यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :